priya bapat fitness secret : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Priya Bapat ही नेहमीच तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि तंदुरुस्त शरीरयष्टीमुळे चर्चेत असते. वयाच्या ३९ व्या वर्षीही ती स्क्रीनवर जशी चमकून दिसते, तशीच वास्तविक आयुष्यातही तिचा फ्रेश लूक चाहत्यांना थक्क करतो. अलीकडेच ती तिच्या ‘असंभव’ या नवीन थरारक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना, तिने स्वतःचा फिटनेस मंत्र खुला केला.
News18 लोकमतशी संवाद साधताना Priya Bapat हिने सांगितलं की तिच्यासाठी फिटनेस म्हणजे केवळ वर्कआउट किंवा ठरावीक डाएट नव्हे, तर तो एक सवयीचा भाग आहे. ती म्हणते, “मी स्वतःवर काहीही बंधन घालत नाही किंवा एखादी ट्रेंडिंग डाएट पद्धत फॉलो करत नाही. हे सगळं माझ्या रोजच्या जगण्याचा भाग झालं आहे.”
तिला गोडाची आवड असली तरी ती स्वतःला ‘फूडी’ मानत नाही. आजच्या पिढीला भुरळ पाडणारे पिझ्झा, बर्गर, वडापाव यांसारखे फास्टफूड पदार्थ तिच्या दैनंदिन मेनूमध्ये जवळजवळ नसतात. Priya Bapat हिला सतत बाहेरचं खाणं जमत नाही, त्यामुळे ती साधं, स्वच्छ आणि घरगुती अन्न पसंत करते. तिच्यासाठी वरण-भात, उसळ, कोशिंबीर आणि भाकरी हेच समाधान देणारं जेवण आहे. सॅलेड, सूप किंवा अगदी अंड्यांवरही दिवस काढता येतो, हे ती सहजपणे सांगते.
फिटनेसच्या नियमांमध्ये एक गोष्ट ती काटेकोरपणे पाळते — वेळेत जेवण. Priya Bapat रात्री साडेसातपर्यंत जेवण आटोपते आणि त्यानंतर काहीही खात नाही. तिच्या मते, हा एक छोटासा नियम पाळला तरी शरीर हलकं राहतं, ऊर्जा टिकून राहते आणि झोपही चांगली लागते.
व्यायामाबाबत बोलताना ती सांगते की जिम असो वा होम वर्कआउट, नियमितता महत्त्वाची. ती दररोज पाणी भरपूर पिते, फळं मोठ्या प्रमाणात खाते आणि ‘क्लिन इटिंग’ हेच तिचं सर्वात मोठं शस्त्र असल्याचं नमूद करते.
हे पण वाचा.. रोहित राऊत झाला भारताचा पहिला आय पॉपस्टार!
Priya Bapat हिच्या या साध्या, पण सातत्याने पाळलेल्या सवयींमुळेच ती वयाच्या ३९व्या वर्षीही तितकीच तेजस्वी दिसते. आरोग्य, फिटनेस आणि संतुलित जीवनशैली यावर तिचा ठाम विश्वास असल्यामुळेच तिची प्रत्येक सार्वजनिक उपस्थिती चाहत्यांना प्रेरणा देऊन जाते.
हे पण वाचा.. बिग बॉस १९च्या मंचावर सलमानसोबत रितेश देशमुख ची जबरदस्त एन्ट्री; आज होणार बिग बॉस मराठी ६ ची घोषणा?









