prathamesh parab wife kshitija ghosalkar on self trolling : मराठी इंडस्ट्री असो किंवा हिंदी असो मनोरंजन विश्वातील प्रत्येक कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आता ट्रोलिंग नवीन राहिलेलं नाही. सोशल मीडियावर चाहत्यांच्या सकारात्मक प्रतिक्रियांबरोबरच नकारात्मकता आणि टीकाही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. बरेच कलाकार याकडे दुर्लक्ष करतात पण, काही थेट उत्तरं देतात, तर काही कलाकार त्यांच्या खास शैलीत ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले जाते. याच ट्रोलिंग विषयावर आता अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकर हिने आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
क्षितीजा घोसाळकर ने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर करत ट्रोलिंगविषयी आपली प्रतिक्रिया स्पष्टपणे मांडली आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओत क्षितीजा म्हणते, “आजच्या काळात सगळ्यात सोपं काम म्हणजे ट्रोलिंग. कुणीही फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केला की, लगेच कमेंट्समध्ये जाऊन नकारात्मक बोलायचं. कारण, कमेंट करणं फुकट आहे. मग एखाद्याचा रंग, उंची, कामगिरी किंवा अगदी त्याचं व्यक्तिमत्त्व – कशावरूनही ट्रोल करणं सुरू होतं.”
तक्षितीजा ने पुढे असंही सांगितलं की, “ट्रोल करणाऱ्या प्रत्येकाने हे सगळं करण्याआधी आपण किती परफेक्ट आहोत, हे पाहणं महत्त्वाचं आहे. स्वतःची किती ध्येयं आपण पूर्ण केली आहेत, आपल्यात कोणते गुण आहेत, कोणते नाहीत हे बघणं आवश्यक आहे. त्यामुळे ती म्हणते मला वाटतं की ट्रोलिंग गरजेचं आहे, पण त्याची सुरुवात ही स्वतःपासून व्हायला हवी. आधी स्वतःला ट्रोल करा, स्वतःवर नकारात्मक बोला. जर तुम्हाला हे एकदा करता आलं, तर तुम्हाला दुसऱ्यांना ट्रोल करण्याची गरज पडणार नाही.”
हे पण वाचा.. “कुरळे ब्रदर्स परत सज्ज, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ १४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला”
व्हिडीओमधून क्षितीजाने दिलेला संदेश अनेकांना भावला आहे. तिने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. “अगदी खरं आहे”, “उत्तम बोललीस”, “बरोबर मुद्दा मांडलास” अशा अनेक नेटकऱ्यांने कॉमेंट्स तिच्या समर्थनार्थ केल्या आहेत .
मनोरंजन सृष्टीत प्रथमेश परब पत्नी क्षितीजा ही फारशी समोर येत नाही, पण तिची ही स्पष्टवक्तेपणा दाखवणारी पोस्ट चर्चेत आली आहे. कलाकारांबद्दल होणाऱ्या नकारात्मक ट्रोलिंगला उत्तर देताना तिने दिलेला हा विचार नेटकऱ्यांच्या मनाला भिडला आहे.
हे पण वाचा.. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील बाळजाबाईच्या मुली एक मॉडेल तर दुसरी गुगलमध्ये कामाला Halad Rusli Kunku Hasla







