prasad oak wife manjiri oak kedarnath trip : दिवाळीचा जल्लोष सध्या सर्वत्र रंगात आलेला असताना अनेकजण धार्मिक स्थळांनाही भेट देत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मराठी अभिनेता Prasad Oak यांची पत्नी manjiri oak यांनी हिमालयाच्या कुशीत वसलेल्या केदारनाथ धामाला भेट दिली आहे. बर्फाच्छादित डोंगरांच्या सान्निध्यात आणि शांत वातावरणात त्यांनी घेतलेलं हे दर्शन तिच्या अध्यात्मिक यात्रेतील एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
manjiri oak यांनी आपल्या सोशल मीडियावरून केदारनाथ यात्रेतील काही अप्रतिम फोटो आणि व्हिडीओ शेअर केले असून चाहत्यांनीही त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोंमध्ये स्वच्छ निळं आकाश, पांढरेशुभ्र बर्फाचे थर आणि मंदिराचं मनमोहक सौंदर्य पाहून कोणाचंही मन प्रसन्न होईल. मंदिर बंद होण्यापूर्वी घेतलेलं हे दर्शन तिच्या १२ ज्योतिर्लिंग यात्रेच्या संकल्पातील आणखी एक पायरी पूर्ण करतंय.
श्रावण महिन्यात मंजिरीने त्र्यंबकेश्वर येथे या यात्रेची सुरुवात केली होती. त्यानंतर वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिरातही तिने दर्शन घेतलं होतं. आता केदारनाथला भेट देऊन ती आपला संकल्प पूर्णत्वाकडे नेत आहे. या यात्रेमुळे ती अध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होत असल्याचं तिच्या पोस्टमधून जाणवतं.
फक्त मंजिरीच नव्हे तर यंदा अनेक मराठी कलाकारांनीही केदारनाथला भेट दिली. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांनीही मंदिरात हजेरी लावली होती. हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे तीर्थस्थान प्रत्येक भाविकासाठी खास मानलं जातं.
दरम्यान, भाविकांसाठी मोठी माहिती अशी की यंदा केदारनाथ मंदिराचे दरवाजे २३ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहेत. दिवाळीतील भाऊबीजेच्या दिवशी दरवर्षी मंदिर हिवाळ्यातील प्रचंड बर्फवृष्टीमुळे बंद केले जाते. त्यानंतर सुमारे सहा महिने हे तीर्थस्थान भक्तांसाठी बंद राहते आणि पुन्हा एप्रिल किंवा मे महिन्यात ते उघडले जाते. त्यामुळे सध्या देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत.
हे पण वाचा.. “बाळासाहेब ठाकरेंची ऑफर ऐकून माझे पाय थरथर कापले”, महेश मांजरेकरांचा जुना किस्सा पुन्हा चर्चेत
मंदिराचं आकर्षक आणि दिव्य सौंदर्य हे नेहमीच भाविकांना खेचतं आणि यंदाही त्याला अपवाद नाही. मंजिरी ओकची ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे तर एक प्रेरणादायी अनुभव ठरत आहे. Prasad Oak यांच्या पत्नीमुळे या यात्रेला चाहत्यांचंही अधिक लक्ष वेधलं गेलं आहे. दिवाळीच्या या शुभ काळात तिने केलेली ही भेट अनेकांच्या मनात भक्तिभाव जागवणारी ठरली आहे.
हे पण वाचा..“इंडस्ट्रीत कौतुक झेपत नाही…!” उषा नाडकर्णी यांचा थेट आरोप







