ADVERTISEMENT

रंगावरुन हिणवलं तरी थांबला नाही प्रणित मोरे; ‘बिग बॉस १९’मध्ये उघड केला बालपणीचा वेदनादायक अनुभव

pranit more bigg boss experience : ‘बिग बॉस १९’मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कॉमेडियन प्रणित मोरे याने शोमध्ये आपल्या आयुष्यातील भावनिक प्रसंग उघड केला. लहानपणी रंगावरुन लोकांनी हिणवल्याचा आणि त्यामुळे आत्मविश्वास कमी झाल्याचा अनुभव त्याने शेअर केला.
pranit more bigg boss experience

pranit more bigg boss experience : ‘बिग बॉस १९’मध्ये आपल्या कॉमेडी आणि निरागस स्वभावाने चाहत्यांची मने जिंकणारा मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे अलीकडेच चर्चेत आला आहे. कारण, घरातील एका संवादादरम्यान त्याने पहिल्यांदाच आपल्या आयुष्यातील अत्यंत वैयक्तिक आणि वेदनादायक आठवणी शेअर केल्या. प्रणितने सांगितलं की, लहानपणी त्याला त्याच्या रंगावरून अनेक वेळा हिणवलं गेलं आणि त्याचा त्याच्या आत्मविश्वासावर खोल परिणाम झाला.

शोमध्ये अश्वरशी बोलताना प्रणित म्हणाला की, “लहानपणी मला अनेक वेळा ‘काळा आहेस’ असं म्हणून चिडवलं जायचं. तेव्हा खूप वाईट वाटायचं, कारण हा रंग माझ्या हातात नव्हता. पण लोक मात्र त्यावरून माझी थट्टा करत. त्यामुळे मी अनेक वर्ष आत्मविश्वास हरवून बसलो होतो.” तो पुढे म्हणाला की, शाळा-कॉलेजच्या काळात इंग्रजी नीट बोलता न आल्यामुळेही लोक त्याची टवाळी करत. “लोकांना वाटायचं, तुला इंग्रजी येत नाही म्हणजे तू काहीच करू शकत नाहीस. अशावेळी मी स्वतःला खूप कमी समजायचो,” असं प्रणितने सांगितलं.

Pranit More याने पुढे सांगितलं की, जेव्हा तो या सगळ्या गोष्टींचा सामना करत होता, तेव्हा कॉमेडीच त्याचा आधार बनली. “मी विचार केला, जर लोक मला हिणवतात, तर मी त्यांना बोलण्याआधीच हसवावं. त्यामुळे माझ्या वेदना कमी होतील आणि त्यांनाही आरशात स्वतःचं रूप दिसेल,” असं तो म्हणाला. पण नंतर त्याला उमगलं की असं प्रत्युत्तर देणं म्हणजे तोही त्यांच्यासारखाच वागतोय. “मग मी ठरवलं की, इतरांना दुखावून स्वतःला सिद्ध करायचं नाही, तर माझ्या कामातून, माझ्या विनोदातून लोकांची मनं जिंकायची,” असं तो म्हणाला.

हे पण वाचा.. बाय बाय मुंबई” म्हणत प्राजक्ता माळी झाली रवाना; चाहत्यांना पडला प्रश्न – कुठे चालली प्राजक्ता?

आज Pranit More त्याच विनोदाच्या ताकदीवर ‘बिग बॉस १९’च्या घरात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहे. चाहत्यांकडून त्याला मिळणारा पाठिंबा हेच त्याच्या संघर्षाचं उत्तर आहे. रंगावरुन टोमणे मारणाऱ्या लोकांना प्रणितने आपल्या यशाने शांत उत्तर दिलं आहे. आता तो फक्त कॉमेडीचा नव्हे, तर आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा प्रतीक बनला आहे.

हे पण वाचा.. आपण एकत्र राहुया… रेणुका शहाणेचा धक्कादायक खुलासा; सुरुवातीच्या काळात निर्मात्याने ठेवला होता विचित्र प्रस्ताव

pranit more bigg boss experience