prajakta parab ne bappa sathi banavla naivedya : गणेशोत्सव म्हटलं की भक्तिभाव, उत्साह आणि कुटुंबीयांसोबतच्या क्षणांची नोंद सर्वांच्या मनात राहते. मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार दरवर्षी गणरायाचं स्वागत धूमधडाक्यात करतात, मात्र काहीजण साधेपणातूनही सणाचा आनंद लुटतात. अशीच एक झलक लोकप्रिय मराठी अभिनेत्री Prajakta Parab हिने आपल्या चाहत्यांना दाखवली आहे.
‘मन उडू उडू झालं’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली Prajakta Parab हिने या वर्षी गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य स्वतः बनवला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या व्हिडीओत ती सुरुवातीला खोबरं किसताना दिसते आणि त्याच्यापासून तिने उकडीचे मोदक बनवले. एवढंच नव्हे तर ऋषीभाजी, गरमागरम उसळ, अळूवड्या यांसारखे पारंपरिक पदार्थही तिने स्वतःच्या हाताने बनवले.
‘परबांचा चेडू’ अशा मोकळ्या, आपुलकीच्या कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. “सुगरण आहेस गं”, “सर्वगुण संपन्न प्राजक्ता”, “एक नंबर ताई” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. अभिनेत्री असूनही साधेपणाने सण साजरा करताना दिसलेली Prajakta Parab यामुळे सोशल मीडियावर आणखी चर्चेत आली आहे.
हे पण वाचा.. घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचा 500 वा भाग पूर्ण; निर्माते सोहम बांदेकर यांची भावूक प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेत ती दिसत नसल्याने अनेक चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट करत मालिकेबद्दल प्रश्न विचारले. त्यावर तिनेच उत्तर देत, “मालिका सोडली नाही, लवकरच परत दिसेन” असं स्पष्ट केलं आहे.
Prajakta Parab हिचा हा साधेपणाचा अंदाज केवळ तिच्या पाककौशल्याचं नाही तर कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याच्या नात्याचं प्रतीक आहे. महागडे गिफ्ट्स किंवा फॅन्सी साजशृंगार न करता केवळ प्रेम आणि आपुलकीने केलेला हा सणसोहळा चाहत्यांच्या मनाला भावणारा ठरतोय.







