मराठी चित्रपटसृष्टी आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने अलीकडेच एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला. तिने पुण्यातील येरवडा महिला कारागृहाला भेट देत तेथील महिला कैद्यांसाठी एक विशेष ध्यान सत्र आयोजित केले. या भेटीचा व्हिडीओ Prajakta Mali ने स्वतःच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंट शेअर केला असून, त्याला चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Prajakta Mali ने नेहमीच आपल्या चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री, अभिनयासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय असते. यावेळी तिने स्वतःच्या आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या शिकवणीला अनुसरून महिला कैद्यांसोबत काही वेळ घालवला.
Prajakta Mali ने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, “पुणे महिला कारागृह (सुधारणा-पुनर्वसन) सदिच्छा भेट..! सेवेचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे कोणाचीतरी मनःस्थिती उंचावणे. श्री श्री रविशंकरजी, मीही माझ्या लहानशा क्षमतेत तेच करण्याचा प्रयत्न केला. एक छोटे ध्यान सत्र घेतले. गुरुदेव म्हणतात, कधी कधी आपल्याला रुग्णालये, कारागृह, शेती यासारख्या ठिकाणी भेट द्यावी लागते, जेणेकरून आपल्याला आठवत राहील की आपले आयुष्य किती कृतज्ञतेने भरलेले आहे. ही संधी दिल्याबद्दल ‘माहेर महिलागृहा’चे आभार.”
या शब्दांतून Prajakta Mali च्या मनातील संवेदनशीलता आणि समाजाबद्दलची जाणीव स्पष्टपणे जाणवते. कैद्यांसाठी ध्यान सत्र घेऊन त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हातभार लावण्याचा हा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
हे पण वाचा.. गंजलेल्या नंबरप्लेटसह पोलिसांची व्हॅन; Shashank Ketkar ने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला..
Prajakta Mali चा अभिनय प्रवास तितकाच रंगतदार आहे. तिने करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली. ‘जुळून येती रेशीमगाठी‘ मालिकेने तिला खरी ओळख दिली, तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या लोकप्रिय शोच्या सूत्रसंचालनाने तिच्या लोकप्रियतेत आणखी भर घातली.
चित्रपटसृष्टीतही तिने आपली छाप पाडली आहे. ‘पांडू’, ‘डोक्याला शॉट’, ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झाशी’ आणि ‘फुलवंती’ अशा चित्रपटांतून तिने अभिनयाचा वेगळा पैलू दाखवला. २०२० मध्ये तिने ‘शिवोहम’ प्रोडक्शन हाऊसची स्थापना करून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आणि ‘फुलवंती’ चित्रपटाची निर्मिती तसेच मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली.
तिच्या या येरवडा भेटीबद्दल चाहत्यांनीही सोशल मीडियावर भरभरून कौतुक केले आहे. “तुमचा चाहता म्हणून अभिमान आहे”, “तुम्ही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहात”, “सामाजिक कार्यातून तुम्ही खऱ्या अर्थाने स्टार आहात” अशा अनेक सकारात्मक प्रतिक्रिया तिला मिळाल्या.
हे पण वाचा.. Shilpa Shirodkar च्या गाडीला बसची धडक अभिनेत्रीचा संताप म्हणाली..“सुदैवानं कोणी जखमी झालं नाही”
Prajakta Mali चे हे पाऊल केवळ तिच्या व्यक्तिमत्त्वातील सामाजिक भान अधोरेखित करत नाही, तर मनोरंजन क्षेत्रातील कलाकार समाजासाठी कसे योगदान देऊ शकतात याचाही आदर्श ठरते. अभिनय, उद्योजकता आणि सामाजिक कार्य – या सर्व क्षेत्रांत तिची सक्रियता तिला इतरांपेक्षा वेगळी बनवते.









