ADVERTISEMENT

चहावर फिदा प्राजक्ता माळी; म्हणाली- “चहा असेल तर मसाला चहा पाहिजे, नाहीतर नाही!”

Prajakta Mali tea love : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एका मुलाखतीत चहा आणि कॉफीबाबत मजेशीर मत व्यक्त केलं. “चहा असेल तर मसाला चहा, आणि कॉफी असेल तर स्ट्राँग हवी,” असं स्पष्ट सांगत तिने चहाप्रेमींना खुश केलं.
Prajakta Mali tea love

Prajakta Mali tea love : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि साध्या स्वभावासाठीही चाहत्यांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करून आहे. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमेडी शोचं सूत्रसंचालन करताना प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करते. तिच्या खुमासदार शैलीमुळे हा शो अधिक रंगतदार झाला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतीच एका मुलाखतीत सहभागी झाली होती. या मुलाखतीत तिला चहा आणि कॉफीबद्दल विचारलं असता तिचं उत्तर ऐकून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती म्हणाली, “चहा असेल तर तो आलं टाकलेला मसाला चहा पाहिजे. आणि कॉफी असेल तर ती स्ट्राँग कॉफी हवी. हे नसेल तर मी दोन्ही पिणार नाही, पण असेल तर मला दोन्ही स्ट्राँग हवेत.” तिचं हे वक्तव्य सोशल मीडियावर लगेचच चर्चेचा विषय ठरलं.

चहाच्या आणि कॉफीच्या असंख्य चाहत्यांमध्येही प्राजक्ताच्या मताला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी तिच्या या निवडीला दाद दिली असून “प्राजक्तासारखंच मलाही फक्त मसाला चहा आणि स्ट्राँग कॉफी आवडते” अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. काहींनी तर तिच्या या वक्तव्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत ती खरीच ‘चहा-प्रेमी’ असल्याचं म्हटलं.

हे पण वाचा.. ‘आई कुठे काय करते’ फेम Ashvini Mahangade स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत झळकणार

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर प्राजक्ता माळीने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाची निर्मिती देखील तिने स्वतः केली होती. याशिवाय ती विविध मालिकांमधून आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या ती पूर्णपणे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये व्यस्त असून तिच्या आगामी सिनेमाबद्दल अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मराठी चित्रपटसृष्टीत आज अनेक नव्या अभिनेत्री कार्यरत आहेत, तरीही प्राजक्ता माळी आपल्या मेहनतीमुळे आणि बहुआयामी प्रतिभेमुळे सतत चर्चेत राहते. तिच्या ‘चहा-प्रेमी’ स्वभावामुळे ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

हे पण वाचा.. बांदेकरांच्या आरतीला पूजा बिरारीची उपस्थिती; ‘सोहम-पूजा’ लग्नाच्या चर्चांना उधाण