ADVERTISEMENT

“सोशल मीडियाची भीती वाटायला लागलीय” – प्राजक्ता माळीचा धक्कादायक अनुभव, चाहत्यांना दिला खास सल्ला

prajakta mali social media anubhav : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ने सोशल मीडियावर झालेल्या धक्कादायक अनुभवाचा खुलासा करत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. तिच्या मते, आता सोशल मीडियाचीच भीती वाटू लागली आहे.
prajakta mali social media anubhav

prajakta mali social media anubhav : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमी आपल्या अभिनय, नृत्यकौशल्य आणि व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असते. मालिकांपासून ते सिनेमांपर्यंत आपल्या कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्राजक्तानं नुकतंच सोशल मीडियाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्या मते, आज सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असला तरी त्याचा गैरवापर इतक्या प्रमाणात वाढला आहे की तिला आता या माध्यमाची भीती वाटू लागली आहे.

‘MHJ Unplugged’ या कार्यक्रमात सहभागी होताना प्राजक्तानं तिचा वैयक्तिक अनुभव सांगितला. तिनं उघड केलं की एकदा सायबर क्राईम विभागातील अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी तिला मिळाली होती. त्यांनी दोन तरुणांना पकडलं होतं, ज्यांपैकी एका तरुणाने तिच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून त्यात केवळ विकृत स्वरूपात एडिट केलेले व्हिडीओ टाकले होते. हा प्रकार समजल्यावर प्राजक्ताच्याही मनाला मोठा धक्का बसला.

तिनं सांगितलं, “त्यावेळी त्या मुलाला फोन लावून देण्यात आला. मी त्याला विचारलं, तू असं का करतोयस? त्यावर तो म्हणाला, ‘तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होता म्हणून केलं.’ खरं तर तो स्वतःला माझा चाहता मानायचा, पण सोशल मीडियावर काहीतरी टाकावं म्हणून त्याने चुकीचं पाऊल उचललं. त्याला हेही समजत नव्हतं की तो गुन्हा करत आहे.” प्राजक्ताने हा प्रसंग आठवताना सांगितलं की तो मुलगा अगदी घाबरलेला होता आणि आपल्या घरच्यांना याची माहिती जाऊ नये म्हणून विनवण्या करत होता.

या अनुभवावरून प्राजक्ताने सोशल मीडियाचा वापर करताना सजग राहण्याचा सल्ला दिला. ती म्हणाली, “वैयक्तिक आयुष्याबद्दलची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करणं टाळा. कारण जे आपण बघतो तेच संपूर्ण सत्य असतं असं नाही. वास्तव वेगळं असू शकतं. म्हणून नेहमी सावध राहा.”

हे पण वाचा.. “‘प्रेम नकळत होत नाही!’ गश्मीर महाजनिचं मनमोकळं उत्तर चर्चेत”

Prajakta Mali च्या या विधानामुळे सोशल मीडियाच्या योग्य आणि चुकीच्या वापराबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. प्राजक्ताने दिलेला हा संदेश आजच्या तरुणाईसाठी नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो.

हे पण वाचा.. ”“मी त्यांना दाखवून देईन की…” सावलीच्या आयुष्यात शिवानीमुळे नवा वादंग; ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत रंगणार मोठा ट्विस्ट

prajakta mali social media anubhav