ADVERTISEMENT

‘रानबाजार’च्या भूमिकेसाठी Prajakta Mali ला लागला डिलेमा; अमृता खानविलकरच्या शब्दांनी बदलला निर्णय

Prajakta Mali हिने 'रानबाजार' वेब सीरिजमधील भूमिका नाकारली होती. मात्र अमृता खानविलकरने दिलेल्या सल्ल्यामुळे तिने तो निर्णय बदलला. प्राजक्ताने स्वतःच एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला.
Prajakta Mali

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात आज प्रत्येक घराघरात ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). मालिकांपासून ते मोठ्या पडद्यापर्यंत प्राजक्ताने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेमुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. नंतर ‘चंद्रमुखी’, ‘पावनखिंड’, ‘रानबाजार’ यांसारख्या प्रकल्पांमधून तिच्या अभिनयाला वेगळीच दाद मिळाली. मात्र यामधील एक अनुभव प्राजक्ताने अलीकडेच उघड केला असून, तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Prajakta Mali ने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘रानबाजार’ या वेब सीरिजबद्दल सविस्तर भाष्य केले. या सीरिजमध्ये तिने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या भूमिकेचे भरभरून कौतुक केले, पण सुरुवातीला ही भूमिका करायची की नाही, या द्विधा मनःस्थितीत ती होती, असा खुलासा प्राजक्ताने केला.

मुलाखतीत बोलताना Prajakta Mali म्हणाली, “कधी कधी आपण एखाद्या प्रोजेक्टसाठी होकार द्यावा की नको, या संभ्रमात सापडतो. ‘रानबाजार’च्या वेळेस माझ्याबाबत असंच झालं. स्क्रिप्ट मला खूप आवडली होती, पण सेक्स वर्करची भूमिका साकारायची असल्याने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले. कारण आपली एक इमेज असते, प्रेक्षक काय विचार करतील हा विचार सतत डोक्यात येत होता.”

ती पुढे म्हणाली की, “पूर्ण सीरिजमध्ये काही वादग्रस्त नव्हतं, पण टीझर पाहिल्यानंतर लोकांच्या डोक्यात वेगळीच प्रतिमा तयार होऊ शकते, असं वाटत होतं. त्यामुळे ट्रोलिंग, टीका याची भीती होती. त्यामुळे मी या प्रोजेक्टमधून मागेही सरकले होते.”

या ठिकाणी अमृता खानविलकरची भूमिका निर्णायक ठरली. प्राजक्ताने सांगितले की, “मी ‘रानबाजार’ सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर अमृता खानविलकर माझ्यावर रागावली. तिने मला अक्षरशः शिव्या घातल्या. ती म्हणाली, ‘तू वेडी झाली आहेस का? अभिजित पानसेंसारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळतेय आणि तू ती सोडते आहेस? हा मूर्खपणा करू नकोस.’ “

त्याचवेळी दिग्दर्शक प्रसाद ओक यांनीदेखील Prajakta Mali ला खडसावले. “‘तू आता इमेजचा विचार करू नकोस. फक्त काम कर. अशा संधी वारंवार मिळत नाहीत,’ असा सल्ला प्रसाद ओक यांनी दिला,” असे प्राजक्ताने मुलाखतीत नमूद केले.

अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक यांच्या शब्दांनी प्राजक्ताला आत्मविश्वास दिला आणि तिने ‘रानबाजार‘ करण्याचा निर्णय घेतला. या भूमिकेमुळे तिला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिच्या अभिनयाने केवळ समीक्षकच नव्हे तर प्रेक्षक देखील भारावले.

हे पण वाचा.. “रील्स म्हणजे अभिनय नाही” – हास्यजत्रेच्या मंचावर Prasad Oak यांचं स्पष्ट मत

Prajakta Mali म्हणते, “कधी कधी आपण जास्त विचार करतो. पण शेवटी कामालाच महत्त्व द्यायला हवं. ‘रानबाजार’ ही माझ्या कारकिर्दीतली अविस्मरणीय भूमिका ठरली.”

‘रानबाजार’ प्रदर्शित झाल्यानंतर प्राजक्ताच्या अभिनयाची जोरदार चर्चा झाली. काही ठिकाणी तिच्यावर टीका झाली, पण बहुतेक ठिकाणी तिच्या धाडसाचं कौतुक झालं. आज ती वेब सीरिज तिच्या अभिनय कारकिर्दीतील महत्त्वाची पायरी मानली जाते.

हे पण वाचा.. “तू म्हणशील तसं” नाटकाचा अखेरचा पडदा; Sankarshan Karhade च्या भावुक पोस्टने प्रेक्षकांचे पाणवले डोळे

एक अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमीच प्रयोगशील राहिली आहे. ‘रानबाजार’ करताना आलेला डिलेमा आणि अमृता खानविलकरचा सल्ला हा तिच्या कारकिर्दीतला टर्निंग पॉईंट ठरला. आज प्राजक्ताचे चाहते म्हणतात की, तिने घेतलेला हा निर्णय योग्य होता. अभिनयापलीकडे धाडस दाखवणं आणि आपल्या भीतीवर मात करणं हेच तिच्या यशाचं खरं गमक आहे.