prajakta mali name story leena to prajakta : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री, नृत्यांगना, निर्माती आणि कवयित्री म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेली Prajakta Mali नेहमीच चर्चेत असते. पडद्यावर चुलबुली आणि रंगतदार भूमिका साकारणारी प्राजक्ता, वैयक्तिक आयुष्यात मात्र साध्या आणि संवेदनशील गोष्टींमुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने स्वतःच्या नावामागची गंमतीशीर कहाणी सांगितली.
प्राजक्ताची आई तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणास्थान आहे. ती नेहमीच आपल्या आईविषयी कौतुकाने बोलते. प्राजक्ता म्हणाली, “माझी आई माझ्यापेक्षा दहापट एनर्जेटिक आहे, तिच्यातील जिद्द आणि ताकद मला सतत शिकवते.”
मात्र या मुलाखतीत प्राजक्ताने आपल्या नावामागचा किस्सा सांगताना चाहत्यांनाही आश्चर्यचकित केलं. ती म्हणाली, “माझं नाव खरं तर लीना ठेवायचं आईला होतं. कारण तिची आवडती अभिनेत्री होती लीना चंदावरकर. माझ्या चेहऱ्याचं साम्य तिच्याशी आहे असं लोक म्हणायचे. पण वडील पोलिस असल्यामुळे आम्ही त्या वेळी पोलिस लाईनमध्ये राहत होतो. त्याच लेनमध्ये जन्मलेल्या एका मुलीचं नाव आधीच ‘लीना’ ठेवलं गेलं होतं. हे समजताच आई चिडली आणि म्हणाली, आता मी माझ्या लेकीचं नाव ‘लीना’ ठेवणार नाही.”
यानंतर घरच्यांनी विचार सुरू केला की नाव काय ठेवायचं? योगायोग असा की त्या काळात त्यांच्या घराच्या अंगणात वारंवार प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा. ते पाहून आईने ठरवलं आणि तिच्या लेकीचं नाव ‘प्राजक्ता’ ठेवलं. आज हीच प्राजक्ता माळी मराठीसह हिंदी मनोरंजन क्षेत्रात चमकत आहे. घरी तिला प्रेमाने ‘सोनी’ असंही म्हटलं जातं.
याच मुलाखतीत प्राजक्ताने आणखी एक गोष्ट उलगडली. ती म्हणाली की, पडद्यावर ती जरी उत्साही आणि चैतन्यशील वाटत असली, तरी प्रत्यक्ष आयुष्यात तिला एकटी बसायला खूप आवडतं. मित्रपरिवार आणि कामाच्या गर्दीतही तिला स्वतःसाठी थोडा वेळ एकांतात घालवायला आवडतो.
हे पण वाचा.. “माझं नाव ‘विजया’ ठेवण्यामागचं कारण… अभिनेत्री विजया बाबर हिचा खास खुलासा”
Prajakta Mali ने तिच्या स्वप्नातील प्रोजेक्टबद्दलही सांगितलं. तिची इच्छा आहे की एक भक्कम पॅन इंडिया महिला-केंद्रित चित्रपट करावा. हा चित्रपटच तिच्या कारकिर्दीतील ड्रीम प्रोजेक्ट ठरेल असं तिने स्पष्ट केलं.
एका साध्या योगायोगातून ठरलेलं नाव ‘प्राजक्ता’ आज घराघरांत पोहोचलं आहे. आईने ठेवलेलं हे नाव तिच्या व्यक्तिमत्त्वाला जणू सुंदर ओळख देऊन गेलं आहे.
हे पण वाचा.. “लग्नाच्या अफवांवर प्रतिक्रिया देताना पूजा बिरारीने उघड केला फोनवर आलेल्या मिसकॉलचा किस्सा!”









