prajakta gaikwad reception ankita walawalkar advice : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांच्या विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत होते. पारंपरिक पद्धतीने, घरगुती वातावरणात आणि मराठमोळ्या थाटात या दोघांनी पुण्यात २ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर झालेल्या प्राजक्ता गायकवाड रिसेप्शन ला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. त्यात विशेष लक्ष वेधून घेतलं ते कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने.
रिसेप्शनला येताच अंकिता वालावलकर ने दोघांसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि जोडप्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. मात्र तिचा एक हलकाफुलका सल्ला क्षणात चर्चेचा विषय बनला. व्हिडीओमध्ये अंकिता शंभूराजकडे पाहत म्हणते, “आम्ही मुली खरंच खूप छान असतो, तुम्हाला माहितीच आहे. प्राजक्ता किती गोड आहे हे तर सगळ्यांनाच ठाऊक. जास्त काही करण्याची गरज नाही, आमचं थोडंसं ऐका… मुली नेहमीच बरोबर असतात!” तिच्या या दिलखुलास अंदाजामुळे उपस्थितांनीही कौतुकाने हसत प्रतिसाद दिला.
रिसेप्शनसाठी प्राजक्ताने अबोली रंगाची आकर्षक साडी नेसली होती, तर शंभूराजने देखणा शेरवानी लूक केला होता. लग्नात प्राजक्ताने पारंपरिक हिरव्या नऊवारीत सजलेली, तर शंभूराजने मराठमोळ्या पोशाखात केलेला लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. दोघांच्या लूकचे फोटो सतत सोशल मीडियावर फिरत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
अलीकडेच प्राजक्ता ‘स्मार्ट सुनबाई’ या चित्रपटातून झळकली होती. लग्नाच्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात किशोरी शहाणे आणि सायली देवधरसोबत तिची प्रमुख भूमिका होती. व्यग्र लग्नसोहळ्याच्या दरम्यानही तिच्या कामाची चर्चा वेगळीच होताना दिसली.
हे पण वाचा.. पूजा बिरारी–सोहम बांदेकर लग्न : पूजाची पाठवणी, सुचित्रा बांदेकरांचा सूनमुख विधी चर्चेत
पुण्यात झालेलं प्राजक्ता गायकवाडच रिसेप्शन आणि त्यात अंकिता वालावलकर हिची दिलखुलास उपस्थिती, नुकत्याच लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीसाठी एक खास आणि संस्मरणीय क्षण ठरला आहे.
हे पण वाचा.. शिवानी सुर्वेला चाहत्याची खास भेट; ‘देवयानी’ काळातील गोड आठवण अभिनेत्रीने केली शेअर
prajakta gaikwad reception ankita walawalkar advice










