ADVERTISEMENT

Prajakta Gaikwad चा साखरपुडा थाटात पार पडला.. कोण आहे तिचा भावी जोडीदार?

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री Prajakta Gaikwad हिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावही अखेर समोर आलं आहे. या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Prajakta Gaikwad

मराठी टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री Prajakta Gaikwad सध्या तिच्या खास वैयक्तिक आयुष्यातील एका गोड टप्प्यामुळे चर्चेत आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी‘ मालिकेतील राणी येसुबाईंची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणाऱ्या प्राजक्ताने अखेर तिच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली असून, या खास सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Prajakta Gaikwad ने काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर व्हिडीओ शेअर करत ७ ऑगस्ट रोजी साखरपुडा होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्या व्हिडीओत तिचा मेहंदी सोहळा दाखवण्यात आला होता आणि चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती — नेमकं कोण आहे तिचं भावी जोडीदार?

जून महिन्यापासूनच प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवर काही सूचक पोस्ट शेअर करून चाहत्यांना संकेत दिले होते. “पाहुणे मंडळी” आणि “कुंकवाच्या कार्यक्रमाचे फोटो” अशा कॅप्शनसह शेअर केलेले फोटो पाहून अनेकांना वाटू लागले की अभिनेत्री Prajakta Gaikwad लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. पण होणाऱ्या नवऱ्याचं नाव मात्र तिने त्या वेळेस उघड केलं नव्हतं.

हे पण वाचा.. Vivek Sangle याने घेतलं मुंबईत नवं घर; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्याच्या नव्या स्वप्नाचा गृहप्रवेश!

अखेर ७ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडलेल्या साखरपुड्यात त्या रहस्याचा पडदा उघड झाला आहे. अभिनेत्रीचा होणारा नवरा म्हणजेच तिचा भावी जीवनसाथी शंभुराज! या नावामुळे चाहत्यांमध्ये एक विशेष भावनिक लहर निर्माण झाली आहे. कारण ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेमध्ये तिच्या पात्राचा नवरा संभाजी महाराज होतं, आणि आता खऱ्या आयुष्यातही तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव ‘शंभुराज’ असणं हा एक सुंदर योगायोग मानला जात आहे.

साखरपुड्याच्या या सोहळ्यासाठी Prajakta Gaikwad ने एक सुंदर ऑफ व्हाईट रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती. त्यावर तिने लाल रंगाचा पारंपरिक शेला घेतला होता, ज्यामुळे तिचा लूक अगदी रॉयल आणि नाजूक दिसत होता. विशेष म्हणजे, तिने परिधान केलेल्या ब्लाऊजवर “शंभुराज” हे नाव कोरलेले होते. याचबरोबर तिच्या मेहंदीमध्येही “S व P” अशी अक्षरं दिसून आली, जी त्यांच्या प्रेमाच्या गाठीकडे इशारा करत होती.

प्राजक्ता आणि शंभुराज यांनी या खास दिवशी एकत्र फोटोशूट देखील केलं असून, त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. चाहत्यांसह मराठी मनोरंजन सृष्टीतून अभिनेत्री Prajakta Gaikwad वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास क्षणी तिने आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केल्यामुळे चाहते खूपच भावूक झाले आहेत.

हे पण वाचा.. Vedio: ‘Pinga Ga Pori Pinga’ फेम अभिनेत्रीला पायाला गंभीर दुखापत; प्लास्टर बांधूनही केली शूटिंगची तयारी!

प्राजक्ताच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘नांदा सौख्य भरे’, ‘संत तुकाराम’, ‘आई माझी काळुबाई’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र तिची खरी ओळख ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे निर्माण झाली. राणी येसूबाईच्या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे.

सध्या साखरपुड्यानंतर लग्नाचे ही अधिकृत अपडेट्स येण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. Prajakta Gaikwad ने तिच्या खासगी आयुष्याचं हे गोड पर्व किती आत्मीयतेने शेअर केलं आहे, हे तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सवरून स्पष्ट होतं.

Prajakta Gaikwad च्या साखरपुड्याचे खास फोटोशूट..