ADVERTISEMENT

काहींना ते नकारात्मक वाटलं, पण…रिसेप्शनमधील नंदीवरील एन्ट्रीवर प्राजक्ता गायकवाड यांचं स्पष्ट आणि ठाम उत्तर

prajakata gaikwad reception nandi entry explanation : रिसेप्शनमध्ये नंदीवरून केलेल्या ग्रँड एन्ट्रीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या प्राजक्ता गायकवाड यांनी ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देत पारंपरिक अर्थ स्पष्ट केला आणि आपली भूमिका मांडली.
prajakata gaikwad reception nandi entry explanation

prajakata gaikwad reception nandi entry explanation : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिनं शंभुराजे खुटवड यांच्याशी मराठमोळ्या आणि पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं. लग्नसोहळा, विधी, वेशभूषा आणि दोघांची केमिस्ट्री यामुळे हे लग्न सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधून घेत होतं. विवाहानंतर पार पडलेल्या रिसेप्शनमधील एका खास क्षणामुळे मात्र Prajakata Gaikwad आणि शंभुराज यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.

रिसेप्शनच्या वेळी दोघांनी नंदीवर बसून केलेली एन्ट्री अनेकांना भावली, तर काहींना ती खटकली. या प्रवेशादरम्यान महादेवांच्या वेशातील कलाकार पायी चालताना आणि वधू-वर नंदीवर बसलेले दिसत असल्याने काही सोशल मीडिया युजर्सनी टीकात्मक प्रतिक्रिया दिल्या. या सगळ्या चर्चांनंतर अखेर Prajakata Gaikwad यांनी यावर मौन सोडत आपली बाजू स्पष्ट केली.

एका मुलाखतीत Prajakata Gaikwad म्हणाल्या की, त्यांची एन्ट्री मुद्दाम पारंपरिक आणि वेगळी ठेवण्यात आली होती. अनेक प्रेक्षकांना ती आवडली, काहींना ती नकारात्मक वाटली, हेही तिनं मान्य केलं. मात्र, यामागचा धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ समजून घेणं गरजेचं असल्याचं तिनं स्पष्ट केलं. लग्नाच्या दिवशी वधू आणि वर हे केवळ स्त्री-पुरुष राहत नाहीत, तर त्यांना लक्ष्मी-नारायणाचं रूप मानलं जातं, असा उल्लेख पुराणांमध्ये असल्याचं तिनं सांगितलं. त्यामुळे त्या दृष्टीकोनातूनच ही संकल्पना मांडण्यात आली होती, असं Prajakata Gaikwad यांनी स्पष्ट केलं.

तसंच, पारंपरिक पद्धतीनं लग्न आणि रिसेप्शन साजरं करणं हा आपला जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असल्याचंही तिनं सांगितलं. डीजे, मोठा गोंगाट किंवा ठरावीक ट्रेंडप्रमाणे एन्ट्री करण्याऐवजी काहीतरी वेगळं आणि आपल्या संस्कृतीशी नातं सांगणारं करायचं होतं. या प्रकारची एन्ट्री पुढे एक नवा ट्रेंड ठरू शकते, असंही तिला वाटत असल्याचं Prajakata Gaikwad म्हणाल्या.

लग्नात Prajakata Gaikwad यांनी हिरव्या रंगाची भरजरी नऊवारी साडी नेसून पारंपरिक लूक साकारला होता. शंभुराज यांचाही वेश तितकाच पारंपरिक होता. संगीत समारंभात मात्र दोघांनी हटके अंदाजात डान्स करत उपस्थितांची मनं जिंकली. त्या क्षणांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

हे पण वाचा.. बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणे लवकरच लग्नबंधनात, थाटामाटात पार पडलं केळवण

कामाच्या आघाडीवर पाहिलं तर Prajakata Gaikwad अलीकडेच ‘स्मार्ट सूनबाई’ या चित्रपटात झळकली असून तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे. वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांबाबत ठाम भूमिका मांडत Prajakata Gaikwad यांनी पुन्हा एकदा आपली स्पष्टवक्तेपणा दाखवून दिला आहे.

हे पण वाचा.. लग्नानंतर घर-संसाराची चिंता नको; करिअरवर लक्ष दे – प्राजक्ता गायकवाडला सासरचा भक्कम पाठिंबा

prajakata gaikwad reception nandi entry explanation