prabhas the raja saab trailer 2026 : साऊथ सुपरस्टार prabhas आपल्या दमदार अॅक्शन आणि वेगळ्या भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतो. ‘बाहुबली’ मालिकेनंतर त्याने हिंदी व तेलुगू चित्रपटसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. आता तो आपल्या आगामी चित्रपट ‘The Raja Saab’ मुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
सोशल मीडियावर स्वतः prabhas ने हा ट्रेलर शेअर करत लिहिलं, “Welcome to #TheRajaSaab world.. Trailer out now… See you all in theatres on Jan 9th, 2026.” या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन मारुती यांनी केलं असून निर्मिती ‘पीपल मीडिया फॅक्टरी’चे टी.जी. विश्वप्रसाद करत आहेत. यामध्ये संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचं आधीच जाहीर झालं होतं. त्यामुळे या दोन दिग्गज कलाकारांचा संगम पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
ट्रेलरमध्ये prabhas चा करिष्माई अंदाज, स्टायलिश अॅक्शन सिक्वेन्सेस आणि भव्य सेट डिझाईन यामुळे सिनेमाबाबतची अपेक्षा आणखी वाढली आहे. काही प्रेक्षकांना या चित्रपटात रोमॅन्स आणि ड्रामा यांचीही झलक दिसली आहे. त्यामुळे हा केवळ अॅक्शनपट न राहता एक संपूर्ण एंटरटेनर ठरणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही वर्षांत prabhas चे काही चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकले नसले तरी चाहत्यांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. ‘The Raja Saab’ त्याच्यासाठी करिअरमधील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, अशी अपेक्षा सिनेसृष्टीत व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा.. पारंपरिक सौंदर्यात आरजे महावाश, नवरात्रीच्या गरबा नाईटसाठी परफेक्ट लूक चर्चेत!
हा चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलरनंतर सोशल मीडियावर #TheRajaSaab हा हॅशटॅग ट्रेंड होत असून चाहत्यांनी “हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर ठरणार” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हे पण वाचा.. “‘मराठी कलाकारांनाच मान नाही तर बाहेरचं जग काय मान देणार?’ – संतोष जुवेकरचा सवाल”









