Pooja Birari Halad : अभिनेत्री पूजा बिरारी हळदी समारंभाने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून, तिचा आणि सोहम बंदेकरचा पहिला एकत्र फोटो आता अधिकृतरीत्या चाहत्यांसमोर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगत असल्या तरी या दोघांनी त्यावर कधीही खुली प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र मेहंदी सोहळ्याच्या पोस्टमध्ये पूजाने पहिल्यांदा सोहमला टॅग केल्यानंतर त्यांच्या प्रेमकहाणीला जणू शिक्कामोर्तबच झालं.
Pooja Birari Halad आता पूजाच्या हळदीला झालेल्या धमाकेदार सुरुवातीने लग्नसोहळ्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. बांदेकर कुटुंबाच्या घरी सजलेल्या रंगीबेरंगी समारंभात अनेक कलाकारांची उपस्थिती जाणवत होती. अभिनेत्री सानिका बनारसवाले हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमधून पूजाचा ग्रेसफुल डान्स, तिचा चमकणारा लूक आणि सोहमसोबतचे आनंदाचे क्षण स्पष्ट दिसत आहेत.
पूजा आणि सोहमवर हळद लावतानाचे क्षण चाहत्यांना विशेष भावले. औक्षणाच्या वेळी दोघांनी हात जोडून सर्वांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद चाहत्यांना अधिकच भावूक करत होता. सेटवर झालेल्या केळवण समारंभात पूजाने घेतलेला सोहमच्या नावाचा उखाणा आधीच चर्चेचा विषय ठरला होता. आता तर हळदीतील पहिला एकत्र फोटो पाहून चाहते “बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचं” स्वागत करण्यास उत्सुक दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या तारखेची चर्चा सुरू होती. अखेर आता लग्नसोहळ्याच्या विधींना अधिकृतरीत्या सुरुवात झाली असून उद्या दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या लग्नाला कोणते कलाकार उपस्थित राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पूजा ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे. तर सोहम ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांचे निर्माते म्हणून काम पाहतो. दोघांच्या करिअरसोबत आता त्यांचा नव्या आयुष्यातील टप्पा सुरू होणार आहे आणि त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची मोठी बातमी ठरली आहे.
हे पण वाचा.. बिग बॉस मराठी ६ मध्ये रितेश देशमुख पुन्हा होस्ट म्हणून सज्ज
Pooja Birari Halad









