ADVERTISEMENT

मनोजच्या आजाराने वाढवलं घरचं टेन्शन, ‘पिंगा ग पोरी पिंगा’ मालिकेत वल्लरीची खंबीर साथ!

pinga ga pori pinga valari manoj ajar twist : "पिंगा गा पोरी पिंगा" मालिकेत मनोजच्या आजारामुळे घरात चिंतेचं वातावरण आहे. मात्र वल्लरीच्या खंबीर भूमिकेमुळे कथेत नवा ट्विस्ट येतोय. पुढे काय घडणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
pinga ga pori pinga valari manoj ajar twist

pinga ga pori pinga valari manoj ajar twist : कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी “Pinga Ga Pori Pinga” मालिका सुरुवातीपासूनच पाच मैत्रिणींच्या गाढ मैत्रीमुळे चर्चेत राहिली आहे. संकटं काहीही असो, ही मैत्रीण एकमेकींसाठी नेहमीच उभी राहताना दिसतात. मात्र, सध्या मालिकेत मैत्रीबरोबरच नातेसंबंध आणि आजारपणामुळे नाट्यमय वळण आलं आहे.

काही दिवसांपूर्वी उघड झालं की मनोजला कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला आहे. घटस्थापनेच्या पूजेदरम्यान अचानक तो पडल्याने घरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत, यावर उपचार शक्य नाहीत आणि केवळ काळजी घेणंच एकमेव पर्याय असल्याचं स्पष्ट केलं. हे ऐकल्यानंतर वल्लरीची चिंता अधिक वाढते.

मात्र वल्लरी सहज हार मानणारी नाही. ती मनोजला आधार देत दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेते. यामध्ये तिची खंबीर साथ स्पष्ट दिसते. पण इंदुमतीला वल्लरीचं हे वागणं मान्य नसतं. त्यामुळे घरात वाद निर्माण होतो. मनोज मात्र पत्नीच्या पाठीशी उभा राहत, इंदुमतीला योग्य शब्दांत उत्तर देतो.

दरम्यान, दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर काही नवी माहिती समोर येते. पहिल्या डॉक्टरांच्या सल्ल्यावर वल्लरीला संशय येतो. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे की, मनोजच्या आजारामागे खरं कारण काय आहे? आणि वल्लरीला ते सत्य शोधण्यात यश मिळणार का?

हे पण वाचा.. सायलीच्या शाळेत पुराव्यासोबत फेरफार, प्रिया स्वतःच पडली तोंडावर Tharala Tar Mag 25 September

दुसरीकडे, मालिकेत प्रेरणाच्या आयुष्याचं संकटही वाढताना दिसत आहे. केदार आण्ण्याच्या छळामुळे तिचं जीवन धोक्यात आलं आहे. तेजा याबद्दल वल्लरीला काळजी व्यक्त करते. त्यामुळे प्रेरणाची या अडचणीतून सुटका कशी होणार, हे देखील प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरत आहे.

एकीकडे मनोजच्या आजाराचं सत्य, दुसरीकडे प्रेरणाचं संकट आणि त्यातून उभे राहिलेले कौटुंबिक तणाव… या सगळ्यामुळे “Pinga Ga Pori Pinga” मालिकेत पुढचे भाग नक्कीच अधिक रंजक ठरणार आहेत.

हे पण वाचा.. नवरात्रीत “अक्षया नाईक” चं बोल्ड फोटोशूट; चाहत्यांचं कौतुक आणि सोशल मीडियावर चर्चा

pinga ga pori pinga valari manoj ajar twist

Embedded Instagram Post
If the post does not display, open it on Instagram: