pavitra punia engagement photos viral love story : मनोरंजनविश्वात कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य जितकं रंगतदार असतं तितकंच ते चर्चेतही असतं. त्यात अभिनेत्री Pavitra Punia हिच्या आयुष्यातील एक खास प्रसंग सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अभिनेता एजाज खानसोबतच्या नात्यात ब्रेकअप झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी Pavitra Punia पुन्हा एकदा प्रेमात पडली असून तिनं साखरपुडा करून आपल्या नव्या नात्याला अधिकृत स्वरूप दिलं आहे.
पवित्रानं स्वतः सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर करत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात जाहीर केली आहे. या फोटोमध्ये तिचा प्रियकर गुडघ्यावर बसून तिला अंगठी देताना दिसत आहे. एका सुंदर समुद्रकिनारी हा रोमँटिक क्षण पार पडला असून चाहत्यांनी या क्षणावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दुसऱ्या फोटोत हे दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे Pavitra Punia हिनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव किंवा चेहरा अद्याप उघड केलेला नाही. फक्त फोटोद्वारे तिनं आपल्या भावना चाहत्यांसमोर मांडल्या. तिनं या पोस्टसोबत “Locked in. प्रेमानं हे अधिकृत केलंय” असं लिहित #NS हा हॅशटॅगही शेअर केला आहे.
एका मुलाखतीत बोलताना पवित्रानं या नात्याविषयी अधिक माहिती दिली. “हो, मी पुन्हा प्रेमात पडले आहे. यंदाची दिवाळी माझ्यासाठी खास आहे कारण मी ती त्याच्या कुटुंबासोबत परदेशात साजरी करणार आहे,” असं ती म्हणाली. आपल्या कुटुंबाशिवाय पहिली दिवाळी साजरी करण्याचं थोडंसं दुखः असलं तरी नव्या नात्यातील हा क्षण तिला विशेष आनंद देणारा असल्याचंही तिनं सांगितलं.
ती पुढे म्हणाली, “तो अभिनेता नाही, तो एक व्यावसायिक आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व समजूतदार आणि प्रेमळ आहे. आम्ही बऱ्याच काळापासून एकत्र आहोत आणि हे नातं माझ्यासाठी खूप खास आहे.”
हे पण वाचा.. “राणादाचं दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यांना सरप्राईज! हार्दिक जोशी ने घेतली लाखोंची कार”
या साखरपुड्याच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून चाहत्यांनी पवित्रावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट्सद्वारे तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी विचारणा केली आहे. Pavitra Punia हिच्या या नव्या सुरुवातीमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हे पण वाचा.. तेजश्री प्रधानने साजरी केली दिवाळी; दिग्गज अभिनेते अशोक व निवेदिता सराफ यांच्या घरी खास क्षण









