ADVERTISEMENT

“‘बिग बॉस’ माझ्यासाठी नाहीच! – Partha Bhalerao चं स्पष्ट मत”

‘बिग बॉस’सारख्या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याच्या ऑफरवर अभिनेता Partha Bhalerao यानं पुन्हा एकदा नकार दिला आहे. हा खेळ नैतिकदृष्ट्या मला पटत नाही, असं म्हणत त्यानं स्पष्ट भूमिका घेतली.
Partha Bhalerao

प्रेक्षकप्रिय अभिनेता Partha Bhalerao यानं पुन्हा एकदा ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. ‘बिग बॉस’ हा रिअ‍ॅलिटी शो मराठी मनोरंजनविश्वात आजवरचा सर्वाधिक गाजलेला कार्यक्रम मानला जातो. या शोच्या प्रत्येक सिझनमध्ये विविध क्षेत्रातील, विशेषतः अभिनय क्षेत्रातील नामवंत मंडळींचा सहभाग पाहायला मिळतो. मात्र, पार्थच्या मते हा शो केवळ प्रसिद्धीसाठी नाहीतर इतर कारणांमुळे त्याचं ध्येयच विस्कटू शकतो.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, पार्थनं या शोविषयी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “मला ‘बिग बॉस’साठी दरवर्षी विचारणा केली जाते, पण मी दरवेळी नकार देतो,” असं सांगत त्यानं अनेक कारणांची यादीही दिली. त्याच्या मते, टेलिव्हिजन माध्यम त्याच्या मनास भावत नाही, आणि ‘बिग बॉस’ची मांडणी नैतिकदृष्ट्या त्याला योग्य वाटत नाही.

“दरवेळी असं सांगितलं जातं की, यावेळी नवी पिढी सहभागी होणार आहे, पण शेवटी सगळेच ४० वर्षांच्या पुढचे लोक दिसतात. मग माझ्यासारख्या तरुणाला तिथं अडकवण्याचं प्रयोजन काय?” असं परखडपणे विचारत त्यानं निर्मात्यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला.

हे पण वाचा..“Kedar Shinde च्या प्रतिक्रियेवर वरद चव्हाणचा रोखठोक टोला; ‘बालिशपणा करू नका..चूक स्वीकारा

Partha Bhalerao पुढे म्हणाला की, “मी अभिनय क्षेत्रात केवळ कलाकार म्हणून आलो आहे. माझं करिअर रिअ‍ॅलिटी शोवर अवलंबून नाही. ‘बिग बॉस’सारख्या शोमध्ये भाग घेणं हे अभिनयाचं क्षेत्र नाही, तर वैयक्तिक आयुष्य समोर ठेवण्याची स्पर्धा आहे.”

शोच्या स्वरूपावर भाष्य करताना त्याने स्पष्ट केलं की, त्याला स्क्रिप्टेड वागणं, निरर्थक वादविवाद आणि कृत्रिम अभिनय करण्यात रस नाही. “मी जे करतो ते खरं अभिनय असतो. पण बिग बॉसमध्ये जे होतं, त्याला अभिनय म्हणता येईल असं मला वाटत नाही,” असं तो ठामपणे म्हणाला.

शोमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीबाबतही पार्थनं मत व्यक्त केलं. “लोक म्हणतात, एकदा बिग बॉस केला की, दोन वर्षं तुम्हाला गणपती, दहीहंडीसारख्या इव्हेंट्समध्ये बोलावलं जातं. पण त्यानंतर कोणी विचारतही नाही. हे माझं उद्दिष्टच नाही. मी अभिनयासाठी आलो आहे, लोकप्रियतेसाठी नव्हे,” असं सांगून त्याने आपल्या मूल्यांवर ठाम राहण्याचा निर्धार दाखवला.

हे पण वाचा.. Prajakta Gaikwad चा साखरपुडा थाटात पार पडला.. कोण आहे तिचा भावी जोडीदार?

Partha Bhalerao हे नाव आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श ठरतंय, कारण त्यांनी आपल्या कामातून कायम नवे प्रयोग आणि प्रामाणिक अभिनय दाखवला आहे. ‘बॉईज’ या गाजलेल्या फ्रँचायझीतील चारही भागांत त्याचं योगदान लक्षणीय राहिलं आहे. त्याचप्रमाणे ‘लालबागची राणी’, ‘बस्ता’, आणि ‘गर्ल्स’ सारख्या चित्रपटांतूनही त्याने आपली छाप पाडली आहे.

आज जेव्हा अनेक कलाकार ‘बिग बॉस’सारख्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात, तेव्हा Partha Bhalerao सारखा अभिनेता त्यातून स्वतःला दूर ठेवतो, यामुळे त्याच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त होतं. त्याचा नकार हा केवळ एका रिअ‍ॅलिटी शोला नकार नसून, तो एक स्पष्ट भूमिका आहे – स्वतःच्या मूल्यांवर आणि उद्दिष्टांवर ठाम राहण्याची.

Partha Bhalerao पोस्ट..