Tejashree Pradhan चा गणेशोत्सव खुलणार मोदकांच्या गोडीत, म्हणाली – “मोदक आणि माझी वीण अतूट आहे”
लाडकी अभिनेत्री Tejashree Pradhan हिने यंदा गणेशोत्सव आपल्या कुटुंबासोबत गोरेगावमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. बाप्पाच्या आगमनाबरोबरच मोदकांविषयी असलेलं तिचं प्रेम आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत तिने खास भावना व्यक्त केल्या आहेत.