waaree energies चे शेअर्स 8% नी वधारले; आज तिमाही निकाल जाहीर होणार
भारतातील आघाडीची सौरऊर्जा कंपनी waaree energies आज आपले आर्थिक वर्ष 2024-25 मधील चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. निकालाच्या प्रतिक्षेत असताना शेअर बाजारात कंपनीच्या समभागांमध्ये उसळी पाहायला मिळाली असून, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.