ADVERTISEMENT

Paaru Savlyachi Janu Savali ‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’चा महासंगम – उलगडणार जुन्या गुन्ह्याचं रहस्य

Paaru Savlyachi Janu Savali झी मराठीवरील दोन लोकप्रिय मालिका 'पारू' आणि 'सावळ्याची जणू सावली' आता एका थरारक महासंगमात एकत्र येत आहेत. या विशेष भागात जुना गुन्हा उघड होणार असून, पारू, आदित्य, अहिल्या आणि सारंग यांच्या आयुष्यात नाट्यमय घडामोडी घडणार आहेत.
Paaru Savlyachi Janu Savali

Paaru Savlyachi Janu Savali झी मराठीवरील प्रेक्षकप्रिय मालिका ‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन्ही मालिकांचा खास महासंगम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दोन्ही कथानकांचा संगम म्हणजे नाट्य, रहस्य आणि भावना यांचा परिपूर्ण मेळ असणार आहे. मालिकांच्या कथानकात सध्या रोमांचक घडामोडी सुरू असून, हा विशेष भाग चाहत्यांना स्क्रीनला खिळवून ठेवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महासंगमात पारू, आदित्य, सावली आणि सारंग यांच्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे. शिवानीच्या कपटी डावामुळे सारंगच्या कुटुंबावर संकट येऊ लागतं. तिच्या आखलेल्या धोकादायक योजनेमुळे छोट्या छोट्या घटनांमधून निर्माण झालेला गोंधळ नात्यांवर परिणाम करतो आणि सगळं काही धोक्याच्या टोकावर येऊन ठेपतं Paaru Savlyachi Janu Savali.

दरम्यान, तिलोत्तमा आणि चंद्रकांत यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त किर्लोस्कर कुटुंबाने एक भव्य पार्टी आयोजित केली आहे. या आनंदाच्या प्रसंगी पारू आणि आदित्यलाही आमंत्रण मिळतं. मात्र, हशा आणि आनंदाच्या वातावरणातसुद्धा प्रत्येकाच्या मनात ताण आणि शंका दडलेली असते. पार्टीदरम्यान अहिल्या आणि पारू समोरासमोर येतात, आणि जुन्या आठवणी तसेच न सुटलेले भावनिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येतात.

याच दरम्यान, एक जुनी मर्डर केस पुन्हा समोर येते आणि सारंग व आदित्य यांचं नाव त्यात गुंतल्याचं समजतं. त्यामुळे कथानक कोर्टरूम ड्रामाच्या दिशेने वळतं, जिथे अहिल्या आणि पारू-आदित्य यांच्यात तुफान संघर्ष रंगणार आहे. प्रेक्षकांना या कोर्टातील वादातून अनेक अनपेक्षित वळणं पाहायला मिळतील.

Aboli Serial End ‘अबोली’ मालिकेचा शेवटचा अध्याय! चार वर्षांनंतर ‘स्टार प्रवाह’वरून घेणार निरोप, पार पडली Wrap Up पार्टी

दुसऱ्या बाजूला शिवानी आणि सावली-सारंग यांच्यातील संघर्षही अधिक तीव्र होत चाललाय. सावली आणि पारू दोघीही मिळून या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात वकील म्हणून कालिंदीची दमदार एन्ट्री होणार असून, तिच्या बुद्धिमत्तेमुळे केस एका रोमांचक टप्प्यावर पोहोचेल. महासंगमाच्या शेवटी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सावली आणि सारंगच्या घरात आनंदानं गृहप्रवेश होताना दिसणार आहे. नाट्य, भावना आणि रहस्याचा मिलाफ असलेला Paaru Savlyachi Janu Savali चा हा महासंगम प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.