ADVERTISEMENT

Dance Vedio: झाल्या तिन्ही सांजा… ‘पारू’ मालिकेतील खलनायिकांचा मोहक नृत्य व्हिडीओ व्हायरल!

'पारू' मालिकेतील दिशाची भूमिका साकारणारी पूर्वा शिंदे आणि दामिनीचं पात्र साकारणारी श्रुतकीर्ती सावंत यांचा जुन्या मराठी गाण्यावर नृत्य व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘Better Together’ अशी खास दोस्ती झळकली आहे कॅप्शनमधून.
Dance Vedio

पारू’ मालिकेतील चर्चित खलनायिका, पूर्वा शिंदे आणि श्रुतकीर्ती सावंत या दोघींचा एक खास Dance Vedio  सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मालिकांतील कटकारस्थानं आणि षड्यंत्रांनी प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेल्या या दोन अभिनेत्री एका सुंदर आणि पारंपरिक गाण्यावर थिरकताना दिसत आहेत – तेही ऑफस्क्रीन!

झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘पारू’ या मालिकांचा अलीकडेच महासंगम विशेष भाग प्रक्षेपित करण्यात आला. या भागात दोन्ही मालिकांतील कलाकारांनी एकत्र येऊन पारंपरिक मंगळागौर साजरी केली. शूटिंग दरम्यानच्या ब्रेकमध्ये सेटवर रंगलेल्या या धमाल क्षणांपैकीच एक Dance Vedio आता चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे.

Dance Vedio मध्ये, पूर्वा शिंदे (दिशा) आणि श्रुतकीर्ती सावंत (दामिनी) या दोघी ‘झाल्या तिन्ही सांजा…’ या उषा मंगेशकर यांच्या अजरामर गाण्यावर पारंपरिक वेशात नृत्य करताना दिसतात. नऊवारी साडी, पारंपरिक दागदागिने आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य – हे सर्व प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलंय.

हे पण वाचा..Subodh Bhave झी मराठीवर ६ वर्षांनंतर परततो; ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत साकारणार भूमिका!

📽️ Dance Vedio ची खासियत म्हणजे तो केवळ नृत्यापुरता मर्यादित नाही. व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर “Better Together” असा एक टेक्स्ट दिसतो, ज्याचा उपयोग करत पूर्वाने इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिलं –
“या डान्स व्हिडीओमध्ये आमच्या मागे बॅकग्राऊंडला बेटर टूगेदर (Better Together) असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल… आमचं नातंही अगदी तसंच आहे. माझी सखी – श्रुतकीर्ती.”

या एका वाक्याने त्यांच्या ऑनस्क्रीन ‘खलनायिकां‘च्या प्रतिमेला विराम लागतो आणि त्यांच्या खरी मैत्री प्रेक्षकांच्या मनात आदर निर्माण करते.

नेटकऱ्यांनी Dance Vedio वर भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे. अनेकांनी प्रतिक्रिया देताना लिहिलं –
✨ “दिशा लय भारी!”
✨ “पूर्वा, तू खरंच सुंदर दिसतेस.”
✨ “खलनायिका? ह्या तर नायिकांनाही मागे टाकतात.”
✨ “दोघींचा डान्स अफलातून!”

हे पण वाचा..“रितेशच्या जुन्या क्रशवर Genelia Deshmukh चं रिऍक्शन…वाढदिवशी चाहत्यांचं लक्ष वेधणारा किस्सा!”

या Dance Vedio मुळे एक गोष्ट स्पष्ट झाली – मालिकेतील निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारताना जरी त्या पात्रांमध्ये द्वेष असला, तरी प्रत्यक्ष आयुष्यात पूर्वा आणि श्रुतकीर्ती यांचं नातं प्रेमाचं आणि मैत्रीचं आहे.

दरम्यान, ‘पारू’ मालिकेचा नवीन टाईम स्लॉट ११ ऑगस्टपासून बदलण्यात आला आहे. आता ही मालिका दररोज संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निर्णयामुळे ‘सावळ्याची जणू सावली’ आणि ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकांच्याही वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

पूर्वा शिंदे (दिशा) आणि श्रुतकीर्ती सावंत (दामिनी)  यांच्या Dance Vedio मधील परफॉर्मन्सने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे की सोशल मीडियावरचा कनेक्ट प्रेक्षकांना मालिकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने जोडतो.