ADVERTISEMENT

एका निर्णयानं पालटली आयुष्याची दिशा; ‘तारिणी’ फेम नियती राजवाडेचा भावनिक प्रवास

niyati rajwade heartfelt struggle story : मनोरंजनसृष्टीत झळकत असलेलं नाव Niyati Rajwade. लग्न, घटस्फोट, मुलगा आणि करिअर सांभाळताना तिने अनुभवलेलं वास्तव जरी कटू असलं तरी त्यातूनच ती पुन्हा उभी राहिली. एका रात्रीत घर सोडून नवा प्रवास सुरू करणाऱ्या नियती राजवाडे ने तिच्या संघर्षकाळाबद्दल मोकळेपणाने सांगितलं.
niyati rajwade heartfelt struggle story

niyati rajwade heartfelt struggle story : मनोरंजनविश्व आकर्षक आणि झगमगाटानं भरलेलं दिसत असलं तरी त्यामागे अनेक जणांच्या संघर्षकथा दडलेल्या असतात. छोट्या पडद्यावर ‘तारिणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी नियती राजवाडे ही त्यापैकीच एक अभिनेत्री. आपल्या धैर्यामुळे आणि जिद्दीमुळे स्वतःचा मार्ग स्वतः तयार करणाऱ्या या अभिनेत्रीने अलीकडेच आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि कठीण टप्प्याची आठवण सांगितली.

एका मुलाखतीत नियती राजवाडे म्हणाली की, आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष म्हणजे वैयक्तिक आयुष्य आणि करिअर या दोन्ही गोष्टी संतुलित ठेवणं. लग्नानंतर अचानक परिस्थिती बदलली आणि एका टप्प्यावर तिला घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर एकल पालक म्हणून मुलाचं संगोपन आणि अभिनय क्षेत्रातील अनिश्चितता यांचा सामना करण्याचा काळ तिला पार करावा लागला. “एकल पालकत्व म्हणजे दररोजची नवी लढाई. मुलगा, घर आणि काम या तिन्ही गोष्टी सांभाळताना प्रत्येक क्षणी स्वतःला मजबूत ठेवावं लागतं,” असं ती म्हणाली.

नियती राजवाडे ने पुढे सांगितलं की, तिच्या आयुष्यातील एक कठीण क्षण असा होता जेव्हा तिला एका रात्रीतच राहतं घर सोडावं लागलं. “तो काळ विसरणं अशक्य आहे. कुठे राहायचं, मुलाला कोण सांभाळणार, पुढे काय होणार याचा मोठा ताण होता. अनेक रात्री मी झोप न घेता गेल्या,” तिने भावनिक होत सांगितलं. त्या काळातही तिने शूटिंग चालू ठेवलं आणि काम करतानाच डोळ्यांत अश्रू आले तरी स्वतःला सावरत राहिली.

बालपणीच अभिनयाची सुरुवात केलेली नियती राजवाडे आज चार दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहे. मराठी, हिंदी आणि गुजराती नाटकं, मालिका, यांमधून तिने स्वतःला सिद्ध केलं आहे. कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःची जिद्द यांच्या जोरावर ती आजही नवे प्रकल्प करत आहे.

हे पण वाचा.. माझ्या भूमिकेवरून मला जज करू नका”; कमळी फेम केतकी कुलकर्णीची मनापासून प्रतिक्रिया

या प्रवासातून तिने घेतलेला मोठा धडा म्हणजे—जीवनात वादळं आली तरी स्वतःवरचा विश्वास कधी ढळू द्यायचा नाही. आज ती आत्मविश्वासाने सांगू शकते की, “माझं आयुष्य पुन्हा उभं राहिलं आहे आणि हा प्रवास माझा अभिमान आहे.”

हे पण वाचा.. गोव्यात रंगणार ‘वीण दोघांतली ही तुटेना’चे डेस्टिनेशन वेडिंग; हळदीत होणार गोंधळ, सुश्मितामुळे समर-स्वानंदी अडचणीत?

niyati rajwade heartfelt struggle story