ADVERTISEMENT

सूर्या दादाचं ‘आजोळ चव मामाच्या गावाची’; Nitish Chavan च्या साताऱ्यातील हॉटेलची खासियत जाणून घ्या

मराठी मालिकांचा लोकप्रिय चेहरा नितीश चव्हाण (Nitish Chavan) अभिनयासोबतच आता खाद्यजगतामध्येही पाऊल ठेवले आहे. साताऱ्यातील शाहू चौकात असलेलं त्याचं ‘आजोळ चव मामाच्या गावाची’ हे हॉटेल, मराठमोळ्या चवीसाठी खवय्यांचं नवं ठिकाण ठरत आहे.
Nitish Chavan

मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) आता अभिनयासोबतच एक नवा प्रवास सुरू करत आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत सूर्या दादाची दमदार भूमिका साकारणारा नितीश, पडद्यावर जसा आपलेपणा आणि माणुसकी जपतो, तसाच तो प्रत्यक्ष आयुष्यातही दाखवतो. यंदाच्या वर्षात त्याने अभिनयाच्या बरोबरीने खाद्यजगतात पाऊल ठेवत साताऱ्यात स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे.

हे हॉटेल, ‘आजोळ चव मामाच्या गावाची’ या नावाने साताऱ्यातील शाहू चौकात सुरू करण्यात आलं आहे. नावातच घरगुती आपलेपणाची झलक दिसते आणि तिथे मिळणाऱ्या पदार्थांमध्ये ती प्रत्यक्ष चाखायला मिळते. मिसळ पाव, पोहे, साबुदाणा खिचडी अशा पारंपरिक मराठमोळ्या नाश्त्याचे पदार्थ येथे खास चवीने तयार केले जातात. सकाळपासूनच नाश्त्यासाठी येथे गर्दी असल्याचं दिसतं.

Nitish Chavan ने १ मार्च २०२४ रोजी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने ‘लघु नाष्टिका’ सुरू करत असल्याची घोषणा केली. त्यानंतरपासून चाहत्यांमध्ये आणि खवय्यांमध्ये या ठिकाणाविषयी उत्सुकता निर्माण झाली.

याला आणखी रंगत आली, जेव्हा ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सहकलाकारांनी या हॉटेलला भेट दिली. त्यात अभिनेत्री ईशा संजयचाही समावेश होता, जी मालिकेत राजश्री जगताप ही भूमिका साकारते. ईशाने भेटीदरम्यान खास फोटो शेअर केला आणि त्यावर “आमच्या दादाचं आणि आमच्या हक्काचं” असं कॅप्शन देत Nitish Chavan च्या या नव्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

हे पण वाचा.. सोशल मीडियातून पोहोचलेली माणुसकी; Kedar Shinde ची आजोबांना हार्मोनियमची खास भेट

‘आजोळ चव मामाच्या गावाची’ हे केवळ एक हॉटेल नसून, Nitish Chavan साठी त्याच्या मुळाशी जोडलेलं स्वप्न आहे. अभिनयाच्या गडबडीतही त्याने आपल्या गावातील चवीची आठवण कायम ठेवली आणि तीच चव साताऱ्यात आणण्याचा निर्धार केला. स्थानिकांसाठी हे ठिकाण लवकरच ओळखीचं झालं असून, प्रवासी आणि पर्यटकही येथे चवीचा आनंद घेताना दिसतात.

Nitish Chavan च्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत सूर्यकांत जगताप ही भूमिका साकारत आहे. मालिकेत सूर्या दादा आपल्या चारही बहिणींचा आधारस्तंभ आहे आणि त्यांच्या रक्षणासाठी सदैव तयार असतो. त्याच्या या भूमिकेने प्रेक्षकांमध्ये मोठं स्थान मिळवलं आहे. यापूर्वी ‘लागिरं झालं जी’ या गाजलेल्या मालिकेतही त्याने प्रमुख भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली होती

अभिनय आणि व्यवसाय, या दोन्ही क्षेत्रांत Nitish Chavan सारखं संतुलन राखत आहे. ‘आजोळ चव मामाच्या गावाची’ या हॉटेलद्वारे तो केवळ मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देत नाही, तर स्थानिकांना रोजगाराचं साधनही उपलब्ध करून देत आहे. त्याच्या या नव्या वाटचालीबद्दल चाहते आणि सहकलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हे पण वाचा.. पहलगाम हल्ल्यात पतीला गमावलेल्या हिमांशी नरवालला ‘Bigg Boss 19’ची ऑफर; चर्चांना उधाण

साताऱ्यात येणाऱ्या प्रत्येकासाठी ‘आजोळ चव मामाच्या गावाची’ हे ठिकाण चुकवायचं नाही, असं समीकरण आता तयार झालं आहे. चवीसोबत आपलेपणाची ही मेजवानी अनुभवण्यासाठी खवय्यांची पावलं या हॉटेलकडे वळत आहेत आणि नितीशच्या या उपक्रमामुळे साताऱ्याच्या खाद्यनकाशावर आणखी एक खास पान जोडले गेले आहे.

Nitish Chavan ची इंस्टाग्राम पोस्ट..