nitish chavan aani ms dhoni chaata khulaasa : मराठी मनोरंजन क्षेत्रात झळकणारा एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेता Nitish Chavan. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्याने ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून विशेष ओळख निर्माण केली. त्याचं सहजसुंदर अभिनय कौशल्य, साधेपणा आणि प्रेक्षकांशी जवळीक साधण्याची पद्धत यामुळे तो चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ या भव्य सोहळ्यात अनेक कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील खास आठवणी आणि आवडी-निवडींवर मनमोकळं बोलणं केलं. याच कार्यक्रमात नितीश चव्हाणनेही आपली काही वैयक्तिक आवड शेअर केली आणि त्याच्या चाहत्यांना त्याच्या विचारांची आणखी एक झलक दिली.
नाश्त्यात त्याला कोणते पदार्थ सर्वाधिक आवडतात, असं विचारलं असता तो हसत म्हणाला, “मला इडली, वडा सांबार, फोडणीचा भात आणि भाकरीचा चिवडा खूप आवडतो.” त्याच्या बोलण्यातली साधेपणा आणि आपलेपणा चाहत्यांना लगेच भावली.
यानंतर नितीशला विचारण्यात आलं की, त्याचं स्वप्न काय आहे? त्यावर तो म्हणाला, “आयुष्यात आपल्यामागे जे लोक उभे असतात, त्यांचा पाठिंबा मिळाला की मोठं स्वप्नही गाठणं शक्य होतं. आयडॉल्सकडून शिकत पुढे जाणं मला आवडतं. ते जे करत आले आहेत, त्यातून प्रेरणा घेऊन आपणही आपलं ध्येय साध्य करायचं.”
याच संवादादरम्यान नितीशने त्याच्या आयडॉलबद्दलही खास खुलासा केला. “माझा आवडता क्रिकेटपटू म्हणजे एमएस धोनी. त्याचं मैदानावरील शांत स्वभाव, संघाचं नेतृत्व करण्याची शैली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विजयात तो नेहमी मागे असतो आणि पराजयात पुढे उभा राहतो — हा गुण मला फार आवडतो. त्याचा संयम आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय मला प्रेरणा देतात,” असं तो म्हणाला.
दरम्यान, नितीश चव्हाणच्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा प्रवास अलीकडेच संपला. त्याने या मालिकेत साकारलेली सूर्या दादाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून गेली आहे. या मालिकेनंतर तो पुढे कोणत्या नव्या प्रकल्पात झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
हे पण वाचा.. ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय! ‘काजळमाया’ मालिकेची वेळ प्रसारणाआधीच बदलली; प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त
आपल्या अभिनयासोबतच प्रामाणिकपणे आयडॉल्सकडून शिकणारा हा कलाकार म्हणून Nitish Chavan ओळख निर्माण करत आहे. एमएस धोनीबद्दलचं त्याचं कौतुक हे त्याच्या प्रेरणादायी विचारसरणीचं उत्तम उदाहरण ठरतं.
हे पण वाचा.. मी या इंडस्ट्रीत आलो ते माझ्या वहिनीमुळेच, अभिनेता हार्दिक जोशीच्या डोळ्यांत आलं पाणी Hardeek Joshi









