nishigandha waad bhangarwalya kissa marathi news : मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वगुणसंपन्न, सोज्वळ आणि बुद्धिमान अभिनेत्री म्हणून ‘Nishigandha Waad’ यांचं नाव विशेष मानाने घेतलं जातं. अभिनय क्षेत्रात त्यांनी आपल्या सहजसुंदर सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंतु अलीकडेच त्यांनी आपल्या बालपणीचा एक हळवा पण शिकवण देणारा प्रसंग उघड केला आहे. हा किस्सा ऐकताना कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल इतका तो भावनिक आहे.
निशिगंधा वाड लहान असताना त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे एक भंगार गोळा करणारे वयस्कर आजोबा आले. त्या आजोबांची दयनीय अवस्था पाहून छोट्या निशिगंधाच्या मनात दया आली. निरागस मनाने मदत करायची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. पण तीव्र सहानुभूतीतून तिने विचार न करता थेट कपाटातून आईचे अस्सल हिऱ्याचे कानातले आणून त्या भंगारवाल्याला दिले. तिच्या बालमनात फक्त एकच भावना होती — “या आजोबांना मदत करायला हवी.”
थोड्याच वेळात घरात गोंधळ उडाला. आईला कानातले दिसेनासे झाल्याने त्या रडकुंडीला आल्या. ती कानातली आजीने दिलेली अमूल्य भेट होती. सुरुवातीला घाबरलेल्या निशिगंधा वाड काहीच बोलल्या नाहीत, पण आईला अश्रूंमध्ये पाहून अखेर तिने सत्य सांगितले. मुलीच्या निरागस कृतीने आई काही क्षण नि:शब्द राहिल्या.
काही दिवसांनी तोच भंगारवाला पुन्हा त्यांच्या घरी आला — आणि त्याच्या हातात तीच हिऱ्याची कानातली होती. त्याने शांतपणे म्हणाले, “हे तुमच्या मुलीने दिलं होतं. मी वारकरी माणूस आहे. हे परत न केलं असतं तर पांडुरंगाला काय तोंड दाखवलं असतं? कृपा करून मुलीला रागावू नका.” त्या शब्दांनी निशिगंधाच्या आईच्या डोळ्यांत आदर आणि कृतज्ञतेचे अश्रू आले.
त्या प्रसंगानंतर निशिगंधाच्या आईने तिला एक अमूल्य शिकवण दिली — “दान जरूर करावं, पण ते आपल्या श्रमातून, आपल्या कष्टातून कमावलेल्या गोष्टीतूनच करावं.” या एका वाक्यातून निशिगंधा वाड यांना आयुष्यभरासाठी एक महान मूल्य मिळालं.
हे पण वाचा.. ‘प्रेमाची गोष्ट २’: रिधिमा पंडितचा मराठी चित्रपटसृष्टीत पहिला रोमॅंटिक सिनेमा
‘घर संसार’, ‘प्रेमांकूर’, ‘बंधन’, ‘शेजारी शेजारी’ यांसारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या निशिगंधा वाड आजही तिच्या सौम्य स्वभावाने आणि विचारशील व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांची मने जिंकते. तिचा हा बालपणीचा अनुभव केवळ हसवणारा नाही, तर दान, प्रामाणिकपणा आणि माणुसकीची खरी शिकवण देणारा आहे.
हे पण वाचा.. लग्नाआधीचा मजेशीर किस्सा: मृणाल दुसानिसची नीरजसाठीची चिठ्ठी!









