nilesh sabale bhau kadam ugach award video : मराठी मनोरंजनविश्वात “हसताय ना मंडळी, हसायलाच पाहिजे” हा डायलॉग घराघरात पोहोचवणारे लेखक-दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या Nilesh Sabale Bhau Kadam या जोडीने आता झी मराठीवर नव्या अंदाजात पुनरागमन केलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वात हे दोघे दिसले नव्हते, मात्र आता ‘उगाच अवॉर्ड’ या हटके कार्यक्रमातून त्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता पुन्हा जागी केली आहे.
निलेश साबळे हे केवळ लेखक किंवा सूत्रसंचालक नाहीत, तर दिग्दर्शन आणि अभिनयातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच त्यांचा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता निलेशच्या भविष्यातील आणखी एका मोठ्या प्लॅनचा मजेशीर खुलासा भाऊ कदम यांनी केला आहे, तोही थेट शोमध्ये.
‘उगाच अवॉर्ड’च्या एका व्हिडीओमध्ये भाऊ कदम आणि निलेश साबळे यांच्यात झालेला संवाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात भाऊ कदम ‘चंद्रविलास फाजिल’ या लोकप्रिय व्यक्तिरेखेत प्रेक्षकांसमोर आले आहेत. त्यांच्या एन्ट्रीनंतर निलेश साबळे त्यांचं कौतुक करत धन्यवाद देतात आणि मजेतच तिथून जाण्याचा सल्ला देतात. मात्र, भाऊ कदम लगेचच निलेशचं भविष्य सांगण्याची तयारी दाखवतात.
याच क्षणी Nilesh Sabale Bhau Kadam यांचा खरा रंगतदार संवाद रंगतो. भाऊ कदम निलेशचा हात हातात घेत सांगतात की, भविष्यात निलेश स्वतःचं स्वतंत्र चॅनेल सुरू करणार आहेत. एवढंच नाही तर त्या चॅनेलवरील प्रत्येक मालिकेत भाऊ कदम असणार, असंही ते गंमतीशीरपणे सांगतात. स्वतःचं चॅनेल असल्यामुळे निलेश कुठेही बाहेर काम करायला जाऊ शकणार नाहीत, असा टोला देखील ते लगावतात. या संवादावर निलेश त्यांना मिश्किलपणे हाकलून देतात आणि सेटवर एकच हशा पिकतो.
हे पण वाचा.. तू अभिनेता म्हणून शून्य आहेस…आईच्या कठोर शब्दांनी बदलला अभिनय बेर्डेचा अभिनय प्रवास
या मजेशीर क्षणांनी ‘उगाच अवॉर्ड’ या कार्यक्रमाची उत्सुकता आणखी वाढवली आहे. Nilesh Sabale Bhau Kadam यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, हा शो आज म्हणजेच २८ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे. विनोद, टोमणे आणि हलक्याफुलक्या अंदाजातलं मनोरंजन पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच हा कार्यक्रम पाहतील, यात शंका नाही.
हे पण वाचा.. कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ फेम कांची शिंदेचं स्वप्न सत्यात! नव्या घरात आनंदात गृहप्रवेश







