ADVERTISEMENT

“कुर्बानी ठीक, पण त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर का?” – Nikki Tamboli चं स्पष्ट मत

अभिनेत्री Nikki Tamboli ने ईदच्या दिवशी व्हिगन होण्याचा निर्णय घेतला. कुर्बानीच्या व्हिडीओंबाबत ती म्हणाली, "संस्कृतीचा आदर आहे, पण असे व्हिडीओ पाहून अस्वस्थ वाटतं."
Nikki Tamboli

अभिनेत्री Nikki Tamboli ने ईदच्या दिवशी व्हिगन होण्याचा निर्णय घेतला. कुर्बानीच्या व्हिडीओंबाबत ती म्हणाली, “संस्कृतीचा आदर आहे, पण असे व्हिडीओ पाहून अस्वस्थ वाटतं.”

“कुर्बानी ठीक, पण त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर का?” – Nikki Tamboli चं स्पष्ट मत

Nikki Tamboli : हिने तिच्या स्पष्ट बोलण्यामुळे आणि धाडसी मतांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. ‘बिग बॉस मराठी ५’मधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या निक्कीने अलीकडेच मांसाहार सोडून व्हिगन होण्याचा निर्णय घेतला आहे. तिचा हा निर्णय ईदच्या दिवशी झाल्याने त्याची विशेष चर्चा झाली. याबद्दल एका खास मुलाखतीत निक्कीने तिच्या भावनांना वाचा फोडली.

Nikki Tamboli म्हणाली, “कुर्बानी ही एक प्रथा आहे आणि मी तिचा विरोध करत नाही. प्रत्येक धर्माची परंपरा महत्त्वाची आहे, त्याबद्दल मी कोणतीही टीका करणार नाही. मात्र, सोशल मीडियावर त्या प्राण्यांची कुर्बानी देतानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करणं मला पटत नाही. असे व्हिडीओ बघून मानसिक त्रास होतो. मला त्या प्राण्यांच्या वेदना पाहून खूप वाईट वाटलं, इतकं की मी आणि माझी आई दोघीही रडलो.”

तिने पुढे स्पष्ट केलं की, “मी याआधी मांसाहार केला आहे, पण त्या प्रक्रियेचं वास्तव पाहून मला धक्का बसला. माझ्या भुकेसाठी एखाद्या प्राण्याचा जीव जावा, हे मी आता स्वीकारू शकत नाही. यामुळे मी व्हिगन होण्याचा निर्णय घेतला आणि ईदच्या दिवशीच स्वतःला हा खास गिफ्ट दिला.”

Nikki Tamboli ने सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या कुर्बानीच्या व्हिडीओंवर कठोर भाष्य करताना म्हटलं की, “तुमच्या संस्कृतीचा मी आदर करते, पण देवानेही सांगितलं नाही की हे व्हिडीओ सगळ्यांसमोर टाकावेत. आपली परंपरा पाळावी, पण त्याचे दर्शन सोशल मीडियावर देऊन लोकांना अस्वस्थ करणं चुकीचं आहे.”

तिच्या या वक्तव्यावर चाहत्यांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींनी तिच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं आहे, तर काहींनी हा तिचा वैयक्तिक निर्णय म्हणून त्याचा सन्मान केला आहे.

हे पण वाचा.. मन तळ्यात… मळ्यात…या लोकप्रिय गाण्यावर <div> नवरी मिळे हिटलरला फेम Vallari Viraj Aalapini Nisal Dance Video पाहून चाहते झाले फिदा