ADVERTISEMENT

Nikki Tamboli गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज, अरबाजसोबत करतेय खास डेकोरेशन!

बिग बॉस मराठी ५ मधून चर्चेत आलेली Nikki Tamboli सध्या गणेशोत्सवाच्या तयारीत रमली आहे. आपल्या मुंबईतील घरी ती प्रियकर अरबाज पटेलसोबत मिळून बाप्पाच्या स्वागतासाठी सजावट करत असून या निमित्ताने दोघांनी त्यांच्या खास आठवणींना उजाळा दिला
Nikki Tamboli

बिग बॉस मराठी ५ मधून घराघरात पोहोचलेली Nikki Tamboli आणि तिचा साथीदार अरबाज पटेल ही जोडी आजही प्रेक्षकांच्या चर्चेत असते. नुकताच Nikki चा वाढदिवस दुबईत साजरा झाल्यानंतर आता ही जोडी मुंबईतल्या तिच्या घरी गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त झाली आहे. बाप्पाच्या आगमनासाठी सजावट करताना दोघांनी त्यांच्या खास आठवणी आणि अनुभव शेअर केले.

Nikki Tamboli ने सांगितलं की, “मी लहानपणापासूनच गणेशोत्सवाची आतुरतेने वाट बघायची. सोसायटीत बाप्पा येताच आम्ही वर्गणी गोळा करण्यापासून ते रात्रभर जागरणापर्यंत सगळं करत असायचो. डेकोरेशनसाठी मी कायम पुढाकार घ्यायचे. ढोल, ताशा, नृत्य—हे सगळं माझ्यासाठी उत्सवाचं मोठं आकर्षण होतं. त्यावेळी आईबाबाही अभ्यासावरून सवलत द्यायचे.”

अरबाजनेदेखील आपल्या बालपणाच्या आठवणी उलगडल्या. तो म्हणाला, “आमच्या गल्लीत गणेशोत्सव, दिवाळी, होळी आणि ईद सगळे सण एकत्र साजरे होत. आता त्या वातावरणात थोडा बदल झालाय, पण आठवणी आजही ताज्या आहेत.”

यंदा गणेशोत्सवात Nikki ने अरबाजला आरती शिकवायचं ठरवलं आहे. तिच्या म्हणण्यानुसार, “अरबाजला बऱ्याच आरत्या माहित नाहीत. त्यामुळे या वेळी तो माझ्याकडून शिकणार आहे. मला मात्र सर्व आरत्या पाठ आहेत. इतकंच नव्हे तर रात्री झोप लागत नसेल तर मी हनुमान चालीसा म्हणते. गंमत म्हणजे आता अरबाजच मला सांगतो—‘झोप नाही लागत तर हनुमान चालीसा म्हण’. त्याचा तो सल्ला मला खरंच गोड वाटतो.”

दोघांनी बाप्पाकडे मागितलेल्या इच्छेबद्दल बोलताना Nikki हसत म्हणाली, “आम्हाला फक्त एवढंच हवंय की आमच्या नात्यावर कुणाची वाईट नजर पडू नये.”

हे पण वाचा.. Tejashree Pradhan चा गणेशोत्सव खुलणार मोदकांच्या गोडीत, म्हणाली – “मोदक आणि माझी वीण अतूट आहे”

गणेशोत्सव हा मुंबईकरांसाठी भावनांचा सण आहे. Nikki Tamboli आणि अरबाजची जोडी या तयारीत आणखी उजळून निघत असून त्यांच्या चाहत्यांनाही या नात्याबद्दल खास कुतूहल आहे. बिग बॉसनंतरही या जोडीनं चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान कायम ठेवलं आहे आणि यंदाचा गणेशोत्सव त्यांच्यासाठी आणखी अविस्मरणीय ठरणार यात शंका नाही.