nikhil chavan anushka sarkate marriage rumours : मराठी मनोरंजन विश्वात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकाटे यांचं नातं. दोघांच्या नात्याच्या चर्चा नवीन नाहीत, पण यावेळी त्या अधिकच गाजत आहेत. कारण त्यांच्या सोशल मीडियावरच्या हालचालींनी चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.
निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकाटे यांनी झी मराठीवरील ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेदरम्यानच दोघांमधली मैत्री अधिक घट्ट झाली, असं त्या काळात अनेकांनी नमूद केलं होतं. २०२० साली सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आणि त्यानंतर दोघेही अनेक वेळा एकत्र दिसू लागले. त्यांच्या या जवळिकीमुळेच चाहते आणि प्रेक्षकांमध्ये त्यांचं प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
अलीकडेच अनुष्का सरकाटेचा वाढदिवस निखिल चव्हाणने खास पद्धतीने साजरा केला. त्याने सोशल मीडियावर तिच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “हॅप्पी बर्थडे खतरनाक अनुष्का!” या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आणि पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं. काही चाहत्यांनी तर कमेंटमध्ये थेट विचारलं, “लग्न कधी आहे?”
सध्या दोघेही त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त आहेत. निखिल चव्हाण सध्या देवेंद्र पेम लिखित आणि दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ या नाटकात काम करत आहे. याशिवाय तो अभिनेता भरत जाधव यांच्यासोबत ‘तू तू मी मी’ या नाटकातही झळकतो आहे. तसेच त्याचा आगामी मराठी चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, अनुष्का सरकाटेने ‘तुझीच रे’ मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं आणि ‘कारभारी लयभारी’मुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली.
हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरचा ग्लॅमरस अवतार चर्चेत; चाहत्यांना भुरळ घालणारे फोटो व्हायरल
निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकाटे या दोघांबद्दलचे संबंधाचे वृत्त अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेले नसले तरी त्यांच्या चाहत्यांना या जोडप्याकडून एका आनंदवार्तेची आतुरतेने प्रतीक्षा आहे. जर हे वृत्त खरं ठरलं, तर मराठी कलाविश्वात आणखी एक सुंदर जोडी लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहे.
हे पण वाचा.. ६ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मिळाला प्रेमाचा होकार; शिवानी नाईक आणि अमित रेखीची आठ वर्षांची सुंदर प्रेमकहाणी









