ADVERTISEMENT

कमळी मालिकेत मोठा कट उघडकीस येणार? कामिनीच्या कारस्थानामुळे नातेसंबंधांवर संकट

New twist in the Kamali serial : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळी मध्ये नवनवीन ट्विस्ट येत असून, अन्नपूर्णा आजी आणि कमळी यांच्यात गैरसमज निर्माण करण्यासाठी कामिनी धोकादायक खेळी खेळताना दिसणार आहे.
New twist in the Kamali serial

New twist in the Kamali serial : झी मराठीवरील Kamali ही मालिका सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या टप्प्यावर पोहोचली आहे. गावातून मुंबईत आलेली कमळी तिच्या कष्टाळू स्वभावामुळे आणि न थकणाऱ्या जिद्दीमुळे प्रत्येक अडचणीवर मात करत पुढे जाताना दिसते. तिच्या आयुष्यातील संघर्ष, भावनिक नातेसंबंध आणि कौटुंबिक गुपिते यामुळे मालिकेची कथा अधिकच रंजक होत चालली आहे.

सध्या Kamali मालिकेत राजन आणि अन्नपूर्णा त्यांच्या हरवलेल्या मोठ्या नातीचा शोध घेताना दिसत आहेत. राजन आणि गौरी यांचा भूतकाळ कथानकाचा महत्त्वाचा भाग ठरत आहे. दोघांचं लग्न झाल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली होती. मात्र नोकरीसाठी राजन परदेशात गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. परत आल्यानंतर त्याला गौरी आणि तिचं कुटुंब कुठेच सापडत नाही. यामागे कामिनीचा मोठा डाव होता.

खरंतर कामिनीने गौरी आणि तिच्या लहान मुलीला संपवण्याचा प्रयत्न केला होता. जीवाच्या भीतीने गौरीने आपल्या वडिलांसह आणि मुलीसह गाव सोडत नवीन ओळख निर्माण केली. तिने स्वतःचं नाव ‘सरोज’ ठेवलं आणि मुलीला राजनच्या कुटुंबापासून कायमच दूर ठेवलं. या सगळ्याचा फायदा घेत कामिनीने आपली मुलगी रागिणीचं लग्न राजनशी लावून दिलं.

मुलीच्या सुरक्षिततेसाठी सरोज मुंबईत येते, मात्र कामिनीच्या नजरेतून ती सुटत नाही. नुकत्याच समोर आलेल्या Kamali च्या प्रोमोमध्ये कामिनी, रागिणी आणि त्यांची मुलगी अनिका मिळून एक धक्कादायक कारस्थान रचताना दिसतात. प्रोमोमध्ये अन्नपूर्णाला फोन येतो, ज्यामध्ये एक मुलगी स्वतःला तिची मोठी नात असल्याचं सांगते. ही बातमी ऐकून अन्नपूर्णा आनंदाने भारावते आणि घरात आनंदाचं वातावरण तयार होतं. मात्र प्रेक्षकांसाठी मोठा धक्का म्हणजे फोन करणारी मोठी नात नसून अनिका असते.

याच प्रोमोमध्ये पुढे सरोजला तोंडावर पट्टी बांधून गाडीतून नेत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर एका अपघाताची बातमी अन्नपूर्णाला कळवली जाते. आवाज बदलून कामिनी अपघाताची माहिती देते, ज्यामुळे अन्नपूर्णा आणि राजन हादरून जातात. ते घटनास्थळी पोहोचतात, जिथे सरोज बेशुद्ध अवस्थेत असते. कमळीही तिथे पोहोचते, मात्र तिला तिच्या आईला भेटता येत नाही, त्यामुळे सत्य तिच्यापासून अजूनही लपलेलं राहते.

हे पण वाचा.. मी तुझ्या प्रेमात नाही, पण तू मला आवडतेस…” अंबर गणपुळेंचं वेगळंच प्रपोजल चर्चेत

झी मराठीने हा प्रोमो शेअर करत “अन्नपूर्णा आजी आणि कमळी यांच्यात कामिनी दरी निर्माण करू शकेल का?” असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे पुढील भागांमध्ये Kamali मालिकेत नातेसंबंध, कटकारस्थानं आणि सत्य उघड होण्याचा थरार पाहायला मिळणार आहे. कमळीच अन्नपूर्णाची खरी मोठी नात आहे, हे सत्य नेमकं कधी समोर येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

हे पण वाचा.. देवमाणूस मधून सिमरन खेडकर ची एक्झिट पोस्ट शेअर करत म्हणाली

New twist in the Kamali serial