New promo of Yed Lagla Premach Mihir entry : स्टार प्रवाह वाहिनीवरील Yed Lagla Premach ही मालिका गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करत आहे. पूजा बिरारी आणि विशाल निकम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. कथानक, भावनिक संघर्ष आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे Yed Lagla Premach महाराष्ट्रातील लोकप्रिय मालिकांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.
सध्या मालिकेत राया आणि मंजिरी यांच्या लग्नाचा ट्रॅक दाखवण्यात आला. अनेक अडचणी, गैरसमज आणि कठीण परिस्थितींना तोंड देत हे दोघं अखेर एकत्र आले. प्रेक्षकांनी या लग्नसोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, लग्नानंतर लगेचच कथानकात धक्कादायक वळण आलं. रायानेच आपल्या मुलाचा खून केल्याचं सत्य जीजीसमोर येतं आणि घरातील वातावरण पूर्णपणे बदलतं. या कठीण प्रसंगातही मंजिरी रायावर विश्वास ठेवते आणि त्याची साथ सोडत नाही. तिचा हा ठाम निर्णय जीजीला अजिबात आवडत नाही आणि रागाच्या भरात ती राया-मंजिरीला घराबाहेर काढते.
याच पार्श्वभूमीवर Yed Lagla Premach चा नवा प्रोमो समोर आला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. या प्रोमोमध्ये मंजिरीच्या आयुष्यात तिच्या पहिल्या नवऱ्याची म्हणजेच मिहीरची पुन्हा एण्ट्री होत असल्याचं स्पष्ट दिसतं. “मंजिरी आणि रायाच्या संसारात येणार हे नवं वादळ” अशा शब्दांत वाहिनीकडून हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे आता मंजिरी आणि रायाच्या नात्यात पुढे काय घडणार, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिहीरची भूमिका बिग बॉस मराठी ५ फेम वैभव चव्हाण साकारणार असल्यामुळे मालिकेबद्दलची चर्चा आणखी वाढली आहे. वैभव चव्हाणने यापूर्वी ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली होती. बिग बॉसच्या घरामुळे त्याला मोठी ओळख मिळाली आणि आता Yed Lagla Premach मधील त्याची एण्ट्री मालिकेला नवं परिमाण देणार असल्याचं मानलं जात आहे.
हे पण वाचा.. स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘घरोघरी मातीच्या चुली’ ला नवी वेळ, ‘‘कोण होतीस तू, काय झालीस तूच काय?
राया-मंजिरीच्या आयुष्यात मिहीरची पुन्हा उपस्थिती नेमका कोणता वळण आणणार? मंजिरीचा भूतकाळ तिच्या वर्तमानावर कसा परिणाम करणार? आणि राया या सगळ्याला कसा सामोरा जाणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागांमध्ये मिळणार असून, Yed Lagla Premach चे आगामी एपिसोड्स अधिकच उत्कंठावर्धक ठरणार हे नक्की.
हे पण वाचा.. माई’ पुन्हा परतली! वर्षा उसगावकर यांची स्टार प्रवाहच्या ‘नशीबवान’ मालिकेत दमदार एन्ट्री









