neha marda personal experience shared : टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री नेहा मर्दा (Neha Marda) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, कारण अलिकडेच दिलेल्या एका मनमोकळ्या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अत्यंत वेदनादायी अनुभवांबद्दल बोलण्याचा धाडसी निर्णय घेतला. बालिका वधूमधील ‘गहना’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेलं तिचं नाव बराच काळ छोट्या पडद्यापासून दूर होतं, मात्र अभिनयविश्वात पुनरागमन करण्याच्या तयारीदरम्यान तिने आयुष्यभर मनात दडवून ठेवलेल्या कहाणीचं ओझं हलकं केलं.
‘जोश टॉक’ या प्लॅटफॉर्मवर बोलताना नेहा मर्दा म्हणाली की, तिच्या करिअरच्या काळात अनेकांनी तिला “आता काम पुरे झाले, कुटुंबाचा विचार कर” असे सल्ले दिले. सुरुवातीला हे साधे कौटुंबिक सल्ले वाटले, पण कालांतराने तिला जाणवलं की लोक तिला मूल होण्याबाबतच टोमणे मारत होते. ती जेव्हा कुठल्याही फंक्शनला किंवा ओळखीच्या कार्यक्रमाला एकटी जायची, तेव्हा “किती दिवस एकटी येणार?” असे प्रश्न सतत तिच्या पाठोपाठ लागायचे. तिच्यासाठी हा भावनिक ताण अधिक कठीण होता, कारण ती आतून खूप मोठ्या संघर्षातून जात होती.
या दरम्यान नेहा मर्दा ने सांगितलं की तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक म्हणजे तीनदा झालेला गर्भपात. हा दु:खद अनुभव ती एकटीच मनात ठेवून जगत होती. समाजाकडून सहानुभूती नको होती, म्हणून तिने हे कुणालाही सांगितलं नाही. १२ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात तिने अनुभवलेली वेदना, मानसिक तणाव आणि सतत वाढणारा दडपणाचा भार — हे सर्व तिने शांतपणे सहन केलं.
याच संघर्षानंतर अखेर ती आई झाली आणि या प्रवासाकडे पाहताना तिच्या डोळ्यातील भावना शब्दांमध्ये सांगणे कठीण होते. Neha Marda म्हणाली की, “असं काही कोणालाही सांगता येत नाही. पण आज मी हे बोलतेय, कारण कधीकधी लोकांच्या शब्दांचा भारही एखाद्याला खूप दुखावू शकतो.”
हे पण वाचा.. मालेगाव चिमुकली प्रकरणावर अभिज्ञा भावेचा संताप; “लक्षात ठेवा हा नराधम…” म्हणत व्यक्त केली तिखट प्रतिक्रिया
तिच्या या मनमोकळ्या संवादामुळे अनेक महिलांना आपल्या अनुभवाची दखल मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. नेहा मर्दा चा हा प्रवास केवळ एक अभिनेत्रीची कथा नसून आयुष्याशी लढणाऱ्या एका स्त्रीची प्रेरणादायी कहाणी ठरते.
हे पण वाचा.. ग्लोव्ह्ज घालून जेवली श्रुती मराठे! गौरवचा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसले









