nashibvan maliket neha naik ani adinath kothare : मराठी मनोरंजनविश्वात सध्या अनेक नवनव्या मालिकांची लगबग सुरु आहे. याच मालिकांपैकी एक म्हणजे ‘नशीबवान’. या मालिकेची खासियत म्हणजे लोकप्रिय अभिनेता आणि निर्माता आदिनाथ कोठारे याची मुख्य भूमिका तसेच मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे नेहा नाईक. संत ज्ञानेश्वरांवरील ‘मुक्ताई’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेली नेहा आता या नव्या भूमिकेमुळे चर्चेत आहे.
या मालिकेत आदिनाथ कोठारे, नेहा नाईक यांच्यासह सोनाली खरे, अजय पुरकर यांसारखे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. १५ सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका खास मुलाखतीत Neha Naik हिने आदिनाथसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “हे सगळंच खूप स्वप्नवत आहे. आधी आम्ही ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र, त्या वेळचा विषय वेगळा होता. जेव्हा मला कळलं की या मालिकेत आदिनाथ माझा सहकलाकार असणार आहे तेव्हा मला धक्काच बसला. पण काम करताना खूप मजा येते.”
नेहा पुढे सांगते की, आदिनाथसोबत काम करताना तिला कधीच दडपण जाणवत नाही. “तो इतकं सहज वातावरण निर्माण करतो की मला अजिबात ताण येत नाही. तो कधीच दाखवत नाही की तो मोठा कलाकार आहे. उलट त्याच्यामुळे माझं दडपण पहिल्याच दिवशी नाहीसं झालं. पहिल्या सीनपासून त्याने मला खूप सपोर्ट केला. तो प्रत्येक सीनमध्ये मार्गदर्शन करतो आणि त्याच्या अभिनयात इतकी ताकद आहे की मला त्याच्याकडे बघतच राहावंसं वाटतं,” असे नेहा सांगते.
हे पण वाचा.. अर्णव-ईश्वरीच्या लग्नामुळे वाढला प्रेक्षकांचा उत्साह; ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत नवा ट्विस्ट
तिने आणखी एक महत्त्वाची बाब मांडली की, आदिनाथ तिच्यासाठी फक्त सहकलाकार नाही तर आता तो तिचा चांगला मित्रही झाला आहे. “तो मला सतत काहीतरी नवीन शिकवतो. अभिनयाव्यतिरिक्त सेटवरील वातावरण हलकं ठेवणं, सगळ्यांना आपल्यासारखं वागवणं ही त्याची शैली खूप वेगळी आहे,” असे तिने नमूद केले.
‘नशीबवान’ ही मालिका सुरु होण्यापूर्वीच चर्चेत आली असून Neha Naik च्या या मनमोकळ्या प्रतिक्रिया चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवणाऱ्या ठरत आहेत.
हे पण वाचा.. ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी गोखले हिची नवी कार; चाहत्यांना दाखवली Hyundai Creta ची झलक







