ADVERTISEMENT

नारायणी शास्त्रीचा भीक मागतानाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का काय आहे व्हिडीओ मागील सत्य?

Narayani Shastri viral video :- प्रसिद्ध अभिनेत्री नारायणी शास्त्री हिचा रस्त्यावर गाणं गात भीक मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओ मागचं सत्य समोर आल्यानंतर चाहत्यांनी तिच्या अभिनयकौशल्याचं आणि विनोदबुद्धीचं भरभरून कौतुक केलं.
Narayani Shastri viral video

Narayani Shastri viral video : नेहमीच सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. बऱ्याच वेळा हे व्हिडीओ चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी असतात, तर कधी काही व्हिडिओ चाहत्यांच्या मनात कुतूहल निर्माण करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओत आपल्याला हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री नारायणी शास्त्री ही रस्त्यावर गाणं गाताना तसेच भीक मागताना दिसतेय. तिने डोळ्यावर चष्मा, चेहऱ्यावर वाढलेली दाढी आणि डफली वाजवत गाणं म्हणताना पाहून नेटकरी अक्षरशः थक्क झाले आहेत.

मराठी मधील ‘पक पक पकाक’ चित्रपटातील साळू ही व्यक्तिरेखा आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे आणि तिचं भुमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री नारायणी शास्त्रीचा असा लूक पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना खूप धक्का बसला. “एवढी गाजलेली कलाकार अशी अवस्था का?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

व्हिडीओत आपल्याला नारायणी ‘देखा है पहली बार, साजन की आँखो में प्यार’ हे गाणं गाताना दिसत असून डफलीच्या साथीने गाणं म्हणत ती भीक मागतेय. परंतु यामागचं खर सत्य नेटकऱ्यानंसमोर आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. कारण हा व्हिडीओ वास्तविक नसून नारायणीच्या मालिकेच्या सेटवर मजेशीर अंदाजात तयार करण्यात आलेला व्हिडीओ आहे.

अभिनेत्री नारायणी शास्त्री ने हा व्हिडीओ तिच्या  प्लॅटफॉर्म वर शेअर करताना एक वेगळंच कॅप्शन दिलं होतं. ती म्हणाली, “मी माझा व्यवसाय कधीही बदलू शकते. आणि अत्यंत गांभीर्याने दुसरं काहीतरी करू शकते. म्हणूनच मला अभिनय क्षेत्र आवडतं. कारण तुम्ही एका झटक्यात अनेक गोष्टी साकारू शकता.” तिच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांना तिच्या अभिनयावरील निष्ठा आणि विनोदबुद्धी यांची झलक मिळाली आहे.

हे पण वाचा.. मनाला भिडणारा टीझर! सुबोध भावे आणि मानसी नाईकच्या ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाची जोरदार चर्चा

अभिनेत्री नारायणी शास्त्री ही हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक मान्यवर अभिनेत्री आहे. गेल्या खुप वर्षांपासून ती मालिकांमधून विविध प्रकारच्या भूमिका साकारत दिसते. ती केवळ गंभीरच नव्हे तर विनोदी आणि हटके व्यक्तिरेखाही यशस्वीपणे साकारल्या आहेत. त्यामुळेच या व्हिडीओने लोकांना काही  क्षणासाठी धक्का बसला असला तरी त्यानंतर तिच्या बहुआयामी अभिनयकौशल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगत आहे.

चाहत्यांनी या व्हिडीओखाली कमेंट्स करत नारायणीच्या विनोदबुद्धीचं कौतुक केलं आहे. “तुमचा हा लूक एकदम भन्नाट आहे”, “अभिनेत्री असून इतकी सहजता दाखवणं म्हणजे मोठेपण” अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी तर मजेत लिहिलं की, “हा लूक बघून तर आम्हीही दोन रुपये द्यायला तयार होतो.”

हे पण वाचा.. “जेव्हा मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतो”; प्राजक्ता गायकवाडची पोस्ट चर्चेत

मनोरंजन क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती असलेल्या नारायणी शास्त्रीने पुन्हा एकदा चाहत्यांना हसवलं आणि विचार करायला भाग पाडलं आहे. अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांवर वेगवेगळे प्रभाव टाकण्याची ताकद तिच्यात आहे हे तिच्या या व्हिडीओमुळे स्पष्ट दिसून आले आहे.

Narayani Shastri viral video