ADVERTISEMENT

करण जोहरचा ‘naagzilla’ येतोय, नागलोकाच्या रहस्यांवर आधारित भीषण साहसचित्र; 14 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये धडकणार

करण जोहरचा नवा सिनेमा जगतातलं सर्पलोक आधारित सस्पेन्स – 'naagzilla' येतोय मोठ्या पडद्यावर 14 ऑगस्ट 2026 रोजी!
naagzilla

करण जोहरचा नवा सिनेमा जगतातलं सर्पलोक आधारित सस्पेन्स – ‘naagzilla’ येतोय मोठ्या पडद्यावर 14 ऑगस्ट 2026 रोजी!

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाला आहे. यावेळी त्याने आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा करताना एकदम वेगळी आणि धाडसी कल्पना समोर आणली आहे. ‘naagzilla – नाग लोक का पहला कांड’ असं या चित्रपटाचं नाव असून, हा सिनेमा 14 ऑगस्ट 2026 रोजी देशभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

धर्मा मूव्हीज आणि महावीर जैन फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणारा naagzilla चित्रपट

naagzilla या चित्रपटाची घोषणा करणने आपल्या सोशल मीडियावरून केली आहे. पोस्टमध्ये त्याने प्रेक्षकांना विचारलं, “क्यों, तैयार हो #NaagZilla के लिए?” आणि त्याचसोबत एक दमदार टॅगलाइन दिली – “naagzilla – Naag Lok Ka Pehla Kaand – in Sssssinemas 14th Aug 2026.”

चित्रपटाच्या या भन्नाट घोषणेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता तुफान वाढली आहे. सोशल मीडियावर #NaagZilla हा ट्रेंड झपाट्याने पसरताना दिसतोय. विशेष म्हणजे, या सिनेमात लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. कार्तिकनेही आपल्या इंस्टाग्राम हँडलवर “Can’t wait for this” असं लिहित आपली उत्सुकता व्यक्त केली आहे.

हा चित्रपट एक अलौकिक, साहसी आणि रहस्यमय विश्व उभारणार आहे – असं संकेत दिलं जात आहे. ‘naagzilla’ ही फक्त एक कथा नसून, नागलोकाच्या गूढतेवर आधारित एक अख्खं सिनेमॅटिक युनिव्हर्स उभं करण्याचा एक प्रयत्न असणार आहे, असं चित्रपटाच्या टायटलमधून सूचित होतंय. या कथेमध्ये सापांच्या जगातील पहिला मोठा ‘कांड’ उलगडला जाणार असून, त्यात अॅक्शन, ड्रामा आणि फँटसीचा जबरदस्त तडका असेल, अशी चर्चा आहे.

या प्रोजेक्टमध्ये करण जोहरसोबत अनेक नामवंत निर्माते आणि दिग्दर्शक सहभागी झाले आहेत. यामध्ये महावीर जैन, अदर पूनावाला, अपूर्व मेहता, मृगदीप सिंग लांबा, सुजित जैन, मारीके डिसूजा आणि गौतम मोंडे यांचा समावेश आहे. धर्मा मूव्हीज आणि महावीर जैन फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट, बॉलीवूडमध्ये एक नवीन युगाची सुरुवात करणारा ठरू शकतो.

हे पण वाचा ..ground zero movie : वास्तवाच्या अधारित कथानकात इमरान हाश्मीचा दमदार अभिनय, काश्मीरमधील संघर्षाचे वास्तव उलगडणारा सिनेमा