Muramba serial Suruchi Adarkar entry as Swara : ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे अभिनेत्री सुरूची अडारकर घराघरात पोहोचली आणि अल्पावधीतच मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक ठरली. या मालिकेनंतर तिने विविध मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आता पुन्हा एकदा Suruchi Adarkar प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तिची एन्ट्री थेट स्टार प्रवाहवरील गाजत असलेल्या ‘मुरांबा’ या मालिकेत होत आहे. या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच समोर आला असून, तो पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ ही मालिका गेली तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रमा आणि अक्षय या जोडीचं नातं, त्यातले चढ-उतार आणि भावनिक गुंतागुंत प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारली. मात्र आता या कथेला नवं वळण मिळणार असून, रमा-अक्षयसोबतच स्वरा-अक्षय ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अक्षयच्या आयुष्यात येणारी ही स्वरा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून Suruchi Adarkar आहे.
‘मुरांबा’ मालिकेत सुरूची अडारकर ‘स्वरा’ ही भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे जवळपास १६ वर्षांनंतर ती पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी हा क्षण खास ठरणार आहे. स्वराची व्यक्तिरेखा ही केवळ ग्लॅमरस नसून ती मनमिळावू, हुशार आणि आत्मविश्वासू असल्याचं सांगितलं जात आहे. ती प्रचंड हळवी असून तिच्या डोळ्यात सहज पाणी येतं, पण तरीही आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारी आहे.
स्वतः या भूमिकेबद्दल बोलताना Suruchi Adarkar म्हणाली की, अनेक वर्षांपूर्वी स्टार प्रवाहवरील ‘ओळख’ या मालिकेमुळे तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळाली. पुन्हा एकदा त्याच वाहिनीवर काम करताना वेगळाच आनंद मिळत आहे. स्वरा ही व्यक्तिरेखा खर्या प्रेमावर विश्वास ठेवणारी असून, प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी कधीच एकमेकांपासून दूर जाऊ नये, असा तिचा ठाम विचार आहे.
हे पण वाचा.. बिग बॉस मराठी ६ मध्ये श्रेयस तळपदे सहभागी होणार? अभिनेत्याने दिली स्पष्ट प्रतिक्रिया
स्वराच्या एन्ट्रीमुळे रमा-अक्षयच्या नात्यात नेमकं काय बदल होणार, अक्षयच्या आयुष्यातील हे नवं पर्व कितपत वळण घेणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ‘मुरांबा’ मालिकेतील हा नवा ट्रॅक कथानक अधिक रंगतदार करणार यात शंका नाही. Suruchi Adarkar च्या दमदार पुनरागमनामुळे ही मालिका आणखी चर्चेत येणार आहे.
हे पण वाचा.. नव्या वर्षाची दमदार सुरुवात! सानिका काशीकरने स्वीकारलं ७५ दिवसांचं फिटनेस चॅलेंज









