New twist in Muramba with Swara entry : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Muramba सध्या वेगवेगळ्या वळणांमुळे चर्चेत आहे. रमा आणि अक्षय यांच्यातील नातं, त्यांचं प्रेम, गैरसमज आणि दुरावा या सगळ्या गोष्टींमुळे प्रेक्षक कायम मालिकेशी जोडलेले आहेत. गेल्या काही भागांपासून कथानकात मोठे बदल घडताना दिसत असून त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
काही दिवसांपूर्वी रमाने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेत साईसोबत लग्न करण्याचा निर्धार केला. अक्षयपासून मिळालेल्या वेदनांनंतर तिने हा निर्णय घेतला असला, तरी अक्षयला मात्र उशिरा का होईना, पण आपल्या चुकीची जाणीव झाली. रमाशिवाय आपण कोणाचाही विचार करू शकत नाही, हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे तिला पुन्हा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले.
अक्षयने रमाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र रमा आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिच्या नकारामुळे अक्षय पूर्णपणे खचला होता. अशा कठीण काळात मुकादम कुटुंबाने त्याला खंबीर साथ दिली. रमाला पुन्हा घरात आणण्यासाठी आपण सगळे तुझ्यासोबत आहोत, असा विश्वास कुटुंबीयांनी अक्षयला दिला.
दरम्यान, रमाला दिलेल्या लग्नपत्रिकेनंतर अक्षयनेही एक धक्कादायक पाऊल उचललं. त्याने रमाला त्याच्या लग्नाची पत्रिका दिली, ज्यावर ‘स्वरा आणि अक्षय’ अशी नावे होती. त्यामुळे रमासह प्रेक्षकांनाही स्वरा कोण आहे, याची उत्सुकता लागली होती. आता या प्रश्नाचं उत्तर Muramba मालिकेच्या नव्या प्रोमोमधून समोर आलं आहे.
या प्रोमोमध्ये मुकादम कुटुंबात आनंदाचं वातावरण दिसत आहे. सगळे एकत्र फोटो काढत असताना अचानक स्वरा नावाची मुलगी घरात येते. तिच्या आगमनानंतर अक्षय आणि आरोही तिच्याशी अतिशय आपुलकीने वागताना दिसतात. आरोही तिला मिठी मारून ‘माझी बेस्ट आई’ असं म्हणते, तर अक्षयही तिला आपल्या कुटुंबाचा भाग असल्यासारखं वागवतो. हे सगळं पाहून रमा आतून पूर्णपणे कोलमडते.
हे पण वाचा.. मुरांबा मध्ये सुरूची अडारकरची दमदार एन्ट्री; अक्षयच्या आयुष्यात ‘स्वरा’ म्हणून येणार नवं वळण
स्वरा ही भूमिका अभिनेत्री सुरुची अडारकर साकारत असून तिच्या एण्ट्रीने मालिकेत नवा रंग भरला आहे. प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता स्वराच्या आगमनानंतर रमा साईसोबतचा लग्नाचा निर्णय बदलणार का, की ती कायमच अक्षयपासून दूर जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. Muramba मालिकेतील पुढील भाग प्रेक्षकांसाठी नक्कीच थरारक ठरणार यात शंका नाही.
हे पण वाचा.. बिग बॉस मराठी ६ मध्ये श्रेयस तळपदे सहभागी होणार? अभिनेत्याने दिली स्पष्ट प्रतिक्रिया









