ADVERTISEMENT

शिवानी मुंढेकरचा ‘नमक’ गाण्यावर डान्स; नेटकरी म्हणाले, “नादखुळा परफॉर्मन्स!”

muramba fame shivani mundhekar namak dance video : ‘मुरांबा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली Shivani Mundhekar सोशल मीडियावर शेअर केलेल्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आहे. बिपाशा बसूच्या ‘नमक’ गाण्यावर तिचं सादरीकरण पाहून चाहते म्हणाले – “नादखुळा!”
muramba fame shivani mundhekar namak dance video

muramba fame shivani mundhekar namak dance video : ‘मुरांबा’ मालिकेत रमा म्हणून प्रेक्षकांची मने जिंकणारी Shivani Mundhekar पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. छोट्या पडद्यावर तिच्या भावनिक अभिनयाने प्रेक्षकांना भावूक करणारी शिवानी, यावेळी तिच्या डान्समुळे कौतुकाची पात्र ठरत आहे.

अलीकडेच शिवानीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये ती बिपाशा बसूच्या ‘नमक’ या गाजलेल्या गाण्यावर सादरीकरण करताना दिसते. तिचे हावभाव, आत्मविश्वास आणि स्टाईल पाहून चाहत्यांनी अक्षरशः कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हिडीओ शेअर करताना शिवानीने लिहिलं होतं की, “हे मला खूप दिवसांपासून करायचं होतं, पण धाडस केलं नव्हतं. हा परफॉर्मन्स परफेक्ट नसला तरी यात भावना आणि हावभाव आहेत.”

शिवानीच्या या व्हिडीओवर अभिनेत्री रेवती लेले आणि गिरीजा प्रभू यांनी खास कमेंट्स करत तिचं कौतुक केलं. चाहत्यांनीही तिच्या सादरीकरणावर “नादखुळा”, “सुंदर”, “भारी”, “क्यूट”, “मस्त” अशा प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करून प्रेम व्यक्त केलं.

सोशल मीडियावर सक्रिय असलेली Shivani Mundhekar वेळोवेळी तिचे फोटोज, रील्स आणि सेटवरील मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो.

हे पण वाचा.. “‘हे बघा चौघुलेजी…’, विमानात मुख्यमंत्री फडणवीसांबद्दलचा; समीर चौघुलेनी सांगितला खास किस्सा”

दरम्यान, ‘मुरांबा’ मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास सध्या कथानकात मोठे ट्विस्ट्स पाहायला मिळत आहेत. रमा आणि अक्षयच्या नात्यातील गुंतागुंती, आरोहीमुळे येणारे बदल आणि इरावतीची कारस्थाने या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांचे कुतूहल वाढवले आहे.

शिवानी मुंढेकर हिचा ‘नमक’ गाण्यावरचा हा डान्स व्हिडीओ चाहत्यांसाठी एक वेगळा अनुभव ठरला आहे. तिच्या अभिनयासोबतच आता डान्सिंग टॅलेंटचाही पुरेपूर अंदाज प्रेक्षकांना आला आहे.

हे पण वाचा.. तुळजासोबतच्या प्रवासाने बदललं आयुष्य – मृण्मयी गोंधळेकर च्या पोस्टमागे नेमकं काय?”

muramba fame shivani mundhekar namak dance video