mrunmayee gondhalekar tulja post charchit : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada Serial) सध्या शेवटाकडे वाटचाल करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या मालिकेत तुळजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री Mrunmayee Gondhalekar हिने नुकतीच सोशल मीडियावर केलेली पोस्ट प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. आपल्या पात्राशी असलेली नाळ आणि त्यातून मिळालेला अनुभव तिने भावनिक शब्दांत मांडला आहे.
मृण्मयीने मालिकेतील तुळजासोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, “मृण्मयी आणि तुळजाची पडली गाठ, दोघींत झाली घट्ट मैत्री. मृण्मयी जशी शांत, सोज्वळ; तुळजा तितकीच बिंदास, स्पष्टवक्ती आणि ठाम. या भूमिकेने मला एक वेगळं बळ दिलं. तुळजाने मला शिकवलं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवायलाच हवा.”
तिच्या या पोस्टमध्ये केवळ भावनिक काव्यात्मक ओळीच नाहीत तर प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या पात्राबद्दलची मनापासूनची कृतज्ञताही दिसून आली. ती पुढे म्हणाली की, “वज्र प्रोडक्शनमध्ये तुळजाचा जन्म झाला आणि त्याचसोबत एका नायिकेच्या प्रवासालाही नवीन दिशा मिळाली. तुळजा या व्यक्तिरेखेनं Mrunmayee Gondhalekar ला खऱ्या अर्थानं कलाकार म्हणून घडवलं.”
मृण्मयीने आपल्या पोस्टमध्ये निर्मात्यांपासून ते चॅनेलपर्यंत सर्वांचे आभार मानले. “मनापासून धन्यवाद झी मराठी, वज्र प्रोडक्शन आणि ‘लाखात एक आमचा दादा’ टीमला. हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील,” असं तिने नमूद केलं.
हे पण वाचा.. “हळद रुसली कुंकू हसलं” मधील दुष्यंतची रिअल लाईफ पत्नी चर्चेत; फोटो पाहून चाहते थक्क
ही पोस्ट समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मालिकेच्या समाप्तीबद्दल चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला शुभेच्छा देताना, तुळजाच्या भूमिकेतून दाखवलेली तिची ताकद आणि अभिनयाची खरी ताकद अधोरेखित केली आहे.
Mrunmayee Gondhalekar सध्या मराठी टेलिव्हिजनसह सोशल मीडियावरही सक्रिय असून, तिच्या प्रामाणिक अभिनयामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे ती प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे. तुळजाच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून तिने केवळ मनोरंजनच दिलं नाही तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा एक महत्वाचा संदेशही दिला आहे.
हे पण वाचा.. Kon Hotis Tu Kay Zalis Tu मालिकेतील विद्या उर्फ साक्षी महाजन लग्नबंधनात अडकणार







