गणेशोत्सवाच्या उत्साहाने सारा माहोल भक्तिमय झाला आहे. घराघरांत बाप्पाचं आगमन होत असून, सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर (Mrunmayee Gondhalekar) हिनेसुद्धा गणरायाचं स्वागत आपल्या घरी केलं. विशेष म्हणजे यंदा तिला गणेशोत्सव दोनदा अनुभवण्याची अनोखी संधी मिळाली. एका बाजूला तिच्या घरात १.५ दिवसांचा गणपती विराजमान झाला होता, तर मालिकेत साकारत असलेल्या ‘तुळजा’ या भूमिकेमुळे तिला पुन्हा एकदा बाप्पाची पूजा करण्याची संधी मिळाली.
Mrunmayee Gondhalekar ने याविषयी भावना व्यक्त करताना सांगितलं की, “मी खरोखर भाग्यवान आहे की मला एकाच वर्षी दोनदा गणपती बाप्पाची पूजा करण्याची संधी मिळाली. मालिकेच्या कथानकात जगताप कुटुंबांनी बाप्पाचं स्वागत केलं, आणि आम्ही गणपती आगमनापासून विसर्जनापर्यंत सर्व विधी मनापासून शूट केले. इतकंच नाही तर गौराई बसवण्यापासून ते हरतालिकेची पूजा करण्यापर्यंत प्रत्येक क्षण मी अनुभवला. जणू मालिकेतल्या तुळजामुळंच माझा हा उत्सव दुहेरी आनंदाने साजरा झाला.”
अभिनेत्री Mrunmayee Gondhalekar ने पुढे सांगितले की, घरी नेहमीप्रमाणे आम्ही १.५ दिवसांचा गणपती आणतो. साधं पण देखणं डेकोरेशन, बाप्पाच्या आवडीचे मोदक, अथर्वशीर्षाचे आवर्तन या सगळ्यामुळे घरातला उत्सव अधिक मंगलमय झाला. यावर्षीदेखील आम्ही इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला. “गणेशोत्सव सुरू होण्याआधीच आमच्या सेटवर सणाचं वातावरण निर्माण झालं होतं, आणि त्यामुळे माझ्यासाठी हे वर्ष खूपच खास ठरलं,” असं मृण्मयी म्हणाली.
हे पण वाचा.. “मी ठणठणीत आहे, चुकीच्या बातम्या पसरवू नका” – अभिनेता Mohan Joshi यांच स्पष्ट आवाहन..
Mrunmayee Gondhalekar ने आपल्या अभिनयातून आधीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, या खास प्रसंगामुळे तिने वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात एक सुंदर संतुलन साधलं आहे. घरातल्या बाप्पासोबत मालिकेतल्या बाप्पाची पूजा करण्याचा आनंद तिला दुहेरी समाधान देऊन गेला. तिच्या या अनुभवावर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून, “तुळजामुळं तुला मिळालेला हा खास अनुभव खरंच प्रेरणादायी आहे” अशा शुभेच्छा तिला मिळत आहेत.
हे पण वाचा.. सुवर्ण स्वप्नांचे जग आणि रुपेरी पडद्याची दुनिया : Priya Bapat च्या ग्लॅमरस फोटोशूटची जोरदार चर्चा









