ADVERTISEMENT

दशावतारचा प्रभाव अजूनही तसाच! मृणाल ठाकूर भारावली; दिलीप प्रभावळकरांना दिली खास दाद

mrunal thakur kokan culture dashavatar film review : मराठमोळ्या मृणाल ठाकूरला ‘दशावतार’ पाहून कोकणाची ओढ अधिकच जाणवली. दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाने मंत्रमुग्ध झालेल्या मृणालनं सिनेमाचं आणि कोकणी संस्कृतीचं जोरदार कौतुक केलं.
mrunal thakur kokan culture dashavatar film review

mrunal thakur kokan culture dashavatar film review : मराठी चित्रपटसृष्टीतलं सांस्कृतिक वैभव जगभर पोहोचवत ‘दशावतार’नं मराठी प्रेक्षकांच्यासह परदेशातील रसिकांचीही मनं जिंकली आहेत. कोकणातील परंपरा, लोकनाट्याची ओळख आणि कौटुंबिक नात्यांची भावनिक गुंफण असलेल्या या सिनेमाला आता आणखी एक मोठा बहुमान लाभला आहे. बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्री Mrunal Thakur हिने ‘दशावतार’ पाहून या चित्रपटावर भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे.

सिनेमा पाहिल्यानंतर मृणालनं सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलं की, इतक्या वर्षांनी मराठी संस्कृती, आपलं कोकण आणि तिथली कलासंपदा मोठ्या पडद्यावर इतक्या सुंदरपणे अनुभवायला मिळाली, याचा तिला प्रचंड आनंद झाला. कुडाळच्या निसर्गसौंदर्यापासून ते कोकणातील लोककलेपर्यंत प्रत्येक दृश्यात सच्चेपणा जाणवल्याचं ती म्हणाली. सुबोध खानोलकर दिग्दर्शित हा पहिलाच चित्रपट असूनही त्याचं दिग्दर्शन उत्तम पातळीचं वाटल्याचं मृणाल ठाकूरने नमूद केलं.

दिलीप प्रभावळकरांच्या अप्रतिम अभिनयाबद्दल बोलताना मृणालनं विशेष उल्लेख केला. ती म्हणाली, “दिलीपकाका पडद्यावर दिसतात तेव्हा जादूच निर्माण होते. असा प्रभावशाली अभिनय खरोखर दुर्मिळ.” या सिनेमातील पारंपरिक अवतारांची मांडणी आजच्या समाजातील वास्तवाशी जोडून दाखवल्याचं आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी ही कलाकृती असल्याचं तिनं सांगितलं.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातही ‘दशावतार’ला तुफान प्रतिसाद मिळत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी आणि नॉर्वेतही मराठी सिनेसृष्टीचा हा अनोखा वारसा रसिकांनी स्वीकारला आहे. वाढत्या मागणीनंतर हा चित्रपट मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार असून २१ नोव्हेंबर रोजी केरळमध्ये त्याचा खास शो होणार आहे.

हे पण वाचा.. चाहत्याच्या भावनिक मेसेजनं भारावला अभिनेता संकर्षण कर्‍हाडे; म्हणाला, “असं प्रेम मिळणं हीच खरी कमाई

संपूर्ण टीमचं अभिनंदन करताना Mrunal Thakur हिने पुढे असंही म्हटलं की, अशा कलाकृती येणाऱ्या पिढीसाठी वारसा बनतात. संस्कृती, परंपरा आणि लोककलेची ओळख जपणारे चित्रपट पुढील काळातही मोठ्या प्रमाणावर यावेत यासाठी कलाकार, दिग्दर्शकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

हे पण वाचा.. Pranit More Exit? बिग बॉस १९ मध्ये अनपेक्षित ट्विस्ट; चाहत्यांचा संताप शिगेला!

mrunal thakur kokan culture dashavatar film review