ADVERTISEMENT

“धडकी भरवणारी वास्तवता!” – अभिनेते Milind Gawali यांची सद्यस्थितीवर खरीखुरी प्रतिक्रिया

लोकप्रिय अभिनेते Milind Gawali यांनी सध्याच्या हवामान बदल, पूरस्थिती आणि शहरांच्या असुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. "सगळं किती भीतीदायक आहे," असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
Milind Gawali

मराठी चित्रपटसृष्टीत आणि मालिकांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकणारे लोकप्रिय अभिनेते Milind Gawali पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिनयात रममाण असलेले मिलिंद सोशल मीडियावरही सक्रिय असतात. त्यांच्या पोस्ट्समध्ये ते वेळोवेळी आपले विचार, अनुभव आणि मनातील भावना मांडत असतात. नुकतेच त्यांनी लिहिलेली एक फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सध्याच्या परिस्थितीबाबतची चिंता व्यक्त करताना “सगळं किती भीतीदायक आहे” अशा शब्दांत आपल्या भावना मांडल्या आहेत.

Milind Gawali यांनी सुरुवातीलाच कबूल केले की, अनेक वर्षांपासून त्यांनी बातम्या ऐकणे आणि वर्तमानपत्र वाचणे जवळपास बंद केले होते. “जगात काय चाललंय याची मला कल्पनाही नसायची. तरीही मी आनंदात जगत होतो. शूटिंग करायचं, छानसा सिनेमा पाहायचा, पुस्तक वाचायचं – एवढंच माझं विश्व होतं,” असे ते म्हणाले. सेटवर सहकाऱ्यांशी गप्पा मारताना मिळालेली माहिती हीच त्यांच्या दृष्टीने ‘बातमी’ असायची.

आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधावा हे Milind Gawali यांच्या शब्दांत स्पष्ट जाणवते. ते म्हणतात, “कितीही पाऊस आला तरी मी वेळेआधीच शूटिंग सेटवर पोहोचायचो. उन्हाळ्यात अनेकांना घामामुळे चिडचिड व्हायची, पण मला फारसा त्रास होत नाही. हिवाळा तर मुंबईत मस्तच असतो, पण स्टाईल म्हणून स्वेटर घालायचो.”
त्यांच्या मते प्रत्येक ऋतूला स्वतःची एक वेगळी मजा आहे. पावसात भिजण्याचा आनंद, हिवाळ्यातील गारवा किंवा उन्हाळ्यात सूर्यकिरणांचा उबदार स्पर्श – प्रत्येक ऋतू माणसाला वेगळं शिकवतो.

अभिनेता सांगतात की अलीकडे त्यांनी वडिलांसोबत पुन्हा बातम्या ऐकायला सुरुवात केली. पोलिस खात्यातील कारकीर्दीमुळे वडिलांना बातम्यांचे व्यसनच आहे. पण या बातम्या ऐकताना मनावर जणू धडकीच भरते. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली, घरं वाहून गेली, शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं. रेल्वे, गाड्या आणि मोनोरेल अचानक बंद पडल्या. काही ठिकाणी प्रवासी तासन्‌तास गाड्यांमध्ये अडकून राहिले. “हे सगळं ऐकताना खरोखर भीतीदायक वाटतं. आपली शहरे किती नाजूक झाली आहेत, याची जाणीव होते,” असे Milind Gawali यांनी नमूद केले.

हे पण वाचा.. १२ वर्षांनी प्रिया बापटसोबत पुन्हा स्क्रीनवर Umesh Kamat, अभिनेता म्हणाला – “असा शिक्का बसेल म्हणून…”

Milind Gawali यांनी पुढे सांगितले की, जगभरात अनेक ऐतिहासिक शहरे पाण्याखाली गेल्याची उदाहरणं आहेत. चीनमधील शिचेंग, इटलीतील बाइआ आणि ग्रीसचं पावलोपेट्री ही शहरे आज पाण्याखाली दडली आहेत. हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार भविष्यात मुंबई, न्यूयॉर्क, जकार्ता आणि बँकॉकसारखी आधुनिक शहरेही अंशतः बुडू शकतात. “हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. हे कदाचित भविष्यात काय होऊ शकतं याचे संकेत असतील,” असे ते म्हणाले.

अभिनेता म्हणून Milind Gawali प्रेक्षकांना नेहमीच आपल्या अभिनयाने विचार करायला भाग पाडतात. परंतु या वेळेस त्यांनी व्यक्त केलेले विचार त्यांच्या संवेदनशीलतेची जाणीव करून देतात. दैनंदिन जीवनातील साध्या गोष्टींत आनंद शोधताना, आजूबाजूच्या वास्तवावर भाष्य करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांनाही विचार करायला भाग पाडलं आहे.

हे पण वाचा.. “Marathi Cinema” ला नवा रंग : क्षिती जोग व हेमंत ढोमे पुन्हा घेऊन येत आहेत ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’

Milind Gawali इंस्टाग्राम पोस्ट..