mi sansar majha rekhite new serial update : ‘सन मराठी’ वर सुरू होणारी ‘Mi Sansar Majha Rekhite’ ही नवी मालिका प्रेक्षकांसाठी भावनिक आणि वास्तवाशी निगडित अशी कथा घेऊन येत आहे. १ डिसेंबरच्या रात्री ९:३० वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर आणि अभिनेता हरीश दुधाडे मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यांच्या सोबत आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, पूजा महेंद्र, संदीप गायकवाड आणि वेद आंब्रे हे कलाकार मालिकेला आणखी एक वेगळंच वजन देणार आहेत.
या मालिकेचं केंद्रबिंदू आहे — अनुप्रिया, घरासाठी जगणारी, कोणतीही तक्रार न करता नात्यांच्या रक्षणासाठी सतत झटणारी एक साधी पण मनाने मोठी स्त्री. प्रेमविवाह केल्यानंतर गेली सतराशे वर्ष तिच्या वडिलांनी तिला स्वीकारलं नाही, आणि सासरकडूनही तिला आधार मिळत नाही. तरीही अनुप्रिया तिच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी जपत हसतमुखाने संसार सांभाळते. तिच्या आयुष्यातील संघर्ष असूनही तिच्या स्वप्नांना उभारी देण्याचं काम करते तीची मुलगी — पिहू.
‘Mi Sansar Majha Rekhite’ मध्ये दाखवण्यात येणारी अनुप्रियाची यात्रा ही फक्त एका व्यक्तीची कथा नसून घराघरात दिसणाऱ्या असंख्य स्त्रियांचं चित्रण आहे. समाज आधुनिकतेकडे झेपावत असला तरी विचारसरणी मात्र अनेक ठिकाणी जुन्याच चौकटीत अडकलेली आहे. हे वास्तव दाखवत, स्त्रीला तिच्या क्षमतांची जाण करून देण्याचा आणि तिच्या आयुष्याला नवा बळ देण्याचा प्रयत्न या मालिकेतून करण्यात आला आहे.
हे पण वाचा.. ईशा केसकरच्या एक्झिटनंतर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ बंद होणार? नवीन मालिकांच्या घोषणेमुळे चर्चा
मालिकेच्या प्रोमोनेच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असून शीर्षकगीतानेही सामाजिक माध्यमांवर चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. ही कथा फक्त घरासाठी झगडणाऱ्या स्त्रीची नाही, तर तिच्या स्वप्नांना नवा आकार देण्याचा, तिच्या सामर्थ्याला उजाळा देण्याचा एक संवेदनशील प्रवास आहे. त्यामुळे ‘Mi Sansar Majha Rekhite’ ही मालिका प्रेक्षकांना भावनिक, वास्तववादी आणि प्रेरणादायी अनुभव देईल, अशीच अपेक्षा आहे.
हे पण वाचा.. आमचं Love Marriage! लग्नानंतर सूरज चव्हाणची पहिली खास पोस्ट; बायकोला घेऊन गेला जेजुरीला









