Diljit Dosanjh चा मजेशीर अंदाज, ‘ब्लॅक डॅंडीझम’वर आधारित थीम आणि भारतीय सेलिब्रिटींचा तडका – met gala 2025 या वर्षी पुन्हा एकदा जगभरातील लक्ष वेधणार आहे!
Table of Contents
जगभरातील फॅशनप्रेमींना वर्षभर वाट पाहायला लावणारा met gala 2025 अखेर 5 मे रोजी न्यूयॉर्कमध्ये आयोजित होणार आहे. फॅशनच्या जगतातील ही प्रतिष्ठित आणि भव्य समारंभाची रात्र यंदा अधिक खास ठरणार आहे, कारण यंदाची थीम आहे – “Superfine: Tailoring Black Style” – जी काळ्या समुदायाच्या समृद्ध फॅशन परंपरेवर प्रकाश टाकते. विशेष बाब म्हणजे, यंदा met gala ची थीम पूर्णपणे पुरुषांच्या पोशाखांवर केंद्रित असणार आहे, ही गोष्ट गेल्या दोन दशकांत प्रथमच घडतेय.
Met Gala निमंत्रणावर Diljit Dosanjh चा विनोदी Insta व्हिडिओ
या उच्चभ्रू समारंभासाठी पंजाबी गायक आणि अभिनेता Diljit Dosanjh नेही आपला जलवा दाखवण्याची तयारी केली आहे. डिलजितने आपल्या इंस्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर करत met gala चं निमंत्रण मिळाल्याचं खुलं केलं. या व्हिडिओमध्ये त्याने विनोदी अंदाजात सांगितलं की, “आता कोणतेही लग्नाचे कार्ड नको, कारण माझ्याकडे met gala इन्व्हिटेशन आहे!”
या व्हिडिओमध्ये डिलजितने त्याच्या खास निमंत्रणाचे तपशील उलगडले. त्यात त्याच्यासोबत बसणाऱ्या काही सेलिब्रिटींची नावेही त्याने उघड केली – NBA स्टार लेब्रॉन जेम्स, रॅपर ASAP रॉकी आणि खुद्द अॅना विंटूर यांचा समावेश आहे. डिलजितने ही माहिती विनोदी शैलीत मांडत सांगितलं की, कार्यक्रमात फोटो काढण्यास बंदी आहे. “रील्स नाही करता येणार!” असं तो म्हणाला. एवढंच नाही तर, ‘प्रति व्यक्ति, प्रति प्लेट खर्च आहे’, अशी तुलना भारतीय लग्नांमधील जेवणाच्या गणनेशी करत त्याने हास्यनिर्मिती केली.
हे पण वाचा..sara tendulkar प्रेमप्रकरण पुन्हा चर्चेत; बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत डेटिंगच्या चर्चा जोरात!
मेट गालाचा मुख्य उद्देश मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारणे हा आहे. फॅशन जगतातील सर्वोच्च आणि सर्वात लोकप्रिय हा समारंभ दरवर्षी ‘मे‘ महिन्याच्या पहिल्या सोमवारस साजरा केला जातो. यंदाच्या कार्यक्रमात ब्लॅक डॅंडीझम या संकल्पनेवर आधारित विविध डिझायनर पोशाख पाहायला मिळणार आहेत. Monica L. Miller यांच्या 2009 मध्ये प्रकाशित झालेल्या “Slaves to Fashion” या पुस्तकावर आधारित हा थीम आहे.
“Tailored for You” हा यंदाचा अधिकृत ड्रेस कोड असून, काळ्या समुदायाच्या पुरुषांच्या फॅशनची ऐतिहासिक झलक यातून दिसणार आहे. 18व्या शतकापासून आजवरच्या काळ्या फॅशन परंपरेचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न यंदाच्या प्रदर्शनीत होणार आहे. met gala कमिटीतील सदस्य आणि प्रसिद्ध गायक उशर म्हणाले, “ही थीम केवळ योग्य काळात येतेय असं नाही, तर आपल्या संस्कृतीचा सन्मान करणारी आहे.”
met gala चे आयोजन प्रसिद्ध Vogue संपादक अॅना विंटूर यांच्या नेतृत्वाखाली होते. यंदा त्यांच्यासोबत सह-अध्यक्ष म्हणून फॉर्म्युला वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन, गायक फॅरेल विल्यम्स, अभिनेता कोलमन डोमिंगो, रॅपर ASAP Rocky आणि बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठीच्या कमिटीमध्ये सिमोन बाइल्स, स्पाइक ली, अयो एडेबिरी, डोएची, जॅनेल मोने, आंद्रे 3000 यांसारख्या काळ्या प्रतिभावान व्यक्तींचा समावेश आहे.
गेस्ट लिस्ट
गेस्ट लिस्टबद्दल बोलायचं झालं, तर या वर्षी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पहिल्यांदाच या गालावर दिसण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार तो डिझायनर सब्यसाचीचे पारंपरिक पोशाख घालू शकतो. त्याचबरोबर अभिनेत्री कियारा अडवाणी देखील पहिल्यांदाच रेड कार्पेटवर झळकू शकते, ती सध्या गरोदर असल्याचंही बोललं जात आहे. याशिवाय प्रियंका चोप्रा, झेंडाया, साब्रिना कार्पेंटर, निकोल किडमन, हंटर शेफर यांसारखे अनेक आंतरराष्ट्रीय चेहरे यंदाच्या कार्यक्रमात हजेरी लावतील.
जर तुम्हाला met gala चं थेट प्रक्षेपण पाहायचं असेल, तर Vogue त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर याचे लाईव्ह कव्हरेज करणार आहे. यूएसमधील प्रेक्षक Peacock आणि E! Online वरून ही भव्य रात्र पाहू शकतात. सोशल मीडियावरही भरपूर फोटो आणि व्हिडिओ पुढच्या दिवशी पाहायला मिळणार आहेत.
met gala साठी तिकीट विक्री केली जात नाही. ही एक निमंत्रणावर आधारित खासगी इव्हेंट आहे. एका तिकिटाची किंमत सुमारे $75,000 तर 10-सीट टेबलसाठी $350,000 असते. अर्थात हे सर्व खर्च फॅशन ब्रँड्स आणि डिझायनर स्पॉन्सरशिपमधून भरले जातात, आणि त्यामागचा उद्देश असतो – फॅशन आणि इतिहासाच्या संगमाचा भव्य साजरा!
हे पण वाचा ..babil khan च्या भावनिक व्हिडिओनंतर कुटुंबाचे स्पष्टीकरण