mayuri wagh afva khara karan : मराठी मनोरंजन विश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे मयुरी वाघ. शांत, मनमिळावू स्वभाव आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने छोट्या पडद्यावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘अस्मिता’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली आणि या पात्रानं तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मात्र मागील काही वर्षांपासून ती इंडस्ट्रीपासून थोडी दूर राहिली आणि याच काळात ती अभिनय सोडत असल्याच्या अफवा जोरात पसरल्या. या सगळ्याबाबत मयुरीने अखेर भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अलीकडेच मयुरी वाघने सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने आपल्या अनुपस्थितीबद्दल बोलताना सांगितलं, “लोकांना आजही मी ‘अस्मिता’ म्हणूनच आठवते. हे माझ्यासाठी मोठं यश आहे. पण त्याचबरोबर जबाबदारीही आहे. मला असंच काहीतरी दर्जेदार आणि प्रभावी पात्र करायचं होतं. याच कारणामुळे मी काही प्रोजेक्ट्स नाकारले. आणि कदाचित इथूनच ‘ती इंडस्ट्री सोडली’ ही चर्चा सुरू झाली असावी.”
ती पुढे म्हणाली, “या सगळ्या काळात काही वैयक्तिक गोष्टींमुळे मला स्वतःसाठी वेळ हवा होता. मी सोशल मीडियावरूनही थोडी दूर गेले आणि इंडस्ट्रीशी नियमित संपर्कात नव्हते. त्यात मी माझा मोबाईल नंबर बदलला. त्यामुळे अनेकांना खरंच वाटलं की मी काम करणं थांबवलंय. प्रत्यक्षात मात्र तसं काही नव्हतं. काही प्रोजेक्ट्स आले पण काही कारणांमुळे ते पुढे सरकले आणि मग कोविडचा काळ आला. या सर्व गोष्टींमुळे अनपेक्षितपणे मोठा गॅप पडला.”
मयुरी वाघने यावेळी स्पष्ट केलं की, अभिनय क्षेत्र सोडण्याचा तिचा कधीच विचार नव्हता. उलट दर्जेदार आणि योग्य संधीची वाट पाहणं हेच तिचं ध्येय होतं. तिच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला आहे आणि ती लवकरच नवीन प्रोजेक्ट्समध्ये झळकणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर मयुरी वाघने ‘अस्मिता’, ‘आई एकविरा’, ‘वचन दिले तू मला’, ‘मेजवाणी’ आणि ‘सुगरण’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. लहानपणीच ‘उठी उठी गोपाळा’ या नाटकातून रंगभूमीवर तिच्या अभिनयाची सुरुवात झाली होती. तिच्या अभिनय कारकिर्दीचा हा प्रवास आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
हे पण वाचा.. “मी ते काम कधीच करणार नाही!” — जुई गडकरीचा ठाम निर्णय बोल्ड सीनबाबत
अशा अफवांना उत्तर देत मयुरी वाघने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की ती अभिनय विश्वाशी घट्ट जोडलेली आहे आणि योग्य प्रोजेक्टसाठी ती सदैव तयार आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली ही अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार, अशी चाहत्यांची आतुरता स्पष्ट दिसत आहे.
हे पण वाचा.. ‘‘करवा चौथ’ला रॉकी जयस्वालचा खास अंदाज; पत्नी हिना खानच्या पाया पडत व्यक्त केलं प्रेम









