marathi serial trp report : मराठी टेलिव्हिजन विश्वात प्रत्येक आठवड्यात प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा विषय म्हणजे Marathi Serial टीआरपी रिपोर्ट. ११ ते १७ ऑक्टोबर या आठवड्याचा टीआरपीचा हिशोब जाहीर झाला असून, या वेळीही स्पर्धा जबरदस्त रंगली आहे. झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिन्यांवरच्या मालिकांमध्ये टक्कर पाहायला मिळाली.
या आठवड्यात झी मराठीवरील कमळीने पुन्हा एकदा आपली अव्वल कामगिरी कायम ठेवत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेने ३.७ टीआरपी मिळवत इतर सर्व मालिकांना मागे टाकलं आहे. कमळीच्या कथानकात आणि पात्रांमध्ये आलेल्या भावनिक वळणांमुळे प्रेक्षक मालिकेशी अधिक जोडले गेले आहेत.
तर दुसऱ्या स्थानी अभिनेत्री हर्षदा खानविलकरची लक्ष्मी निवास ही मालिका असून, तिने ३.४ इतका टीआरपी मिळवला आहे. या मालिकेतील कौटुंबिक संघर्ष आणि भावना यामुळे ती सातत्याने चर्चेत राहिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर तेजश्री प्रधानची वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका असून, तिने ३.३ इतका टीआरपी मिळवला आहे. तिच्या मालिकेच्या रेटिंगमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत चांगली वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
झी मराठीच्या टॉप मालिकांची टीआरपी आकडेवारी पुढीलप्रमाणे –
कमळी – ३.७
लक्ष्मी निवास – ३.४
वीण दोघांतली ही तुटेना – ३.३
तारिणी – ३.०
देवमाणूस – २.८
दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनीने पुन्हा एकदा आपला दबदबा दाखवला आहे. या आठवड्यातील टॉप-५ मालिकांपैकी सर्वच मालिका या वाहिनीच्या आहेत. ठरलं तर मग मालिकेने ५.३ टीआरपीसह अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यानंतर घरोघरी मातीच्या चुली (४.७), कोण होतीस तू, काय झालीस तू (४.५), नशीबवान (४.४) आणि लक्ष्मीच्या पाऊलांनी तसेच तू ही रे माझा मितवा (४.२) या मालिकांनी स्थान मिळवले आहे.
प्रेक्षकांच्या पसंतीनुसार Marathi Serial क्षेत्रात या मालिकांची लोकप्रियता सातत्याने वाढताना दिसत आहे. येत्या आठवड्यात झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत स्वानंदी आणि समरचं लग्न होणार असून, हा भाग किती गाजतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान, स्टार प्रवाहवरून नवीन काजळमाया ही मालिका २७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. या नवीन मालिकेच्या ओपनिंग टीआरपीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता पुढच्या आठवड्यात या बदलांचा परिणाम Marathi Serial टीआरपी यादीत कसा दिसेल, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
हे पण वाचा.. ‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकर चा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स









