ADVERTISEMENT

टीआरपीत मोठा धमाका! ‘तू ही रे माझा मितवा’ने दुसऱ्या स्थानी मारली झेप, ‘ही’ मालिका बाहेर; पाहा नव्या यादीत कोण कुठल्या स्थानी

marathi serial trp new list : मराठी मालिकांचा टीआरपी मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेने थेट दुसरे स्थान पटकावत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. ‘ठरलं तर मग’ अजूनही पहिल्या स्थानी कायम आहे, तर एकेकाळी लोकप्रिय असलेली मालिका टॉप-५ मधून बाहेर पडली आहे.
marathi serial trp new list

marathi serial trp new list  : मराठी मालिकांचा टीआरपी मध्ये या आठवड्यात एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. प्रेक्षकांच्या पसंतीच्या स्पर्धेत नव्याने समोर आलेली ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका झपाट्याने पुढे सरकली असून थेट दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.

‘तू ही रे माझा मितवा’ डिसेंबर २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सुरुवातीला रात्री साडेदहाच्या स्लॉटवर प्रसारित होणारी ही मालिका उशिरा येऊनही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. अर्णव आणि ईश्वरीची प्रेमकहाणी प्रेक्षकांना इतकी भावली की, अल्पावधीतच तिच्या टीआरपीमध्ये विक्रमी वाढ झाली. अलीकडेच मालिकेत या दोघांचा विवाहसोहळा दाखवण्यात आला आणि त्यानंतर मालिकेने टीआरपीच्या आकड्यांत रेकॉर्डब्रेक उडी घेतली.

दरम्यान, वाहिनीवर नवीन बदल करण्यात आले. २७ ऑक्टोबरपासून ‘काजळमाया’ ही नवीन मालिका प्रेक्षकांसमोर आली. या मालिकेला साडेदहाचा स्लॉट देण्यात आला आणि ‘अबोली’ ऑफ-एअर झाली. त्यामुळे ‘तू ही रे माझा मितवा’ ला रात्री ८ वाजताची वेळ देण्यात आली. हा निर्णय वाहिनीसाठी अगदी फायद्याचा ठरला आहे, कारण वेळ बदलताच या मालिकेचा टीआरपी थेट ५.० वर पोहोचला आहे आणि ती दुसऱ्या स्थानी झळकली आहे.

या आठवड्याच्या TRP चार्टमध्ये ‘ठरलं तर मग’ ने पुन्हा एकदा पहिलं स्थान मिळवलं आहे. त्याचा टीआरपी ५.५ इतका नोंदवला गेला आहे. दुसऱ्या स्थानी ‘तू ही रे माझा मितवा’, तिसऱ्या स्थानी ‘घरोघरी मातीच्या चुली’ (४.४), चौथ्या स्थानी ‘नशीबवान’ (४.३) आणि पाचव्या स्थानी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ (३.९) या मालिका आहेत.

दरम्यान, वेळ बदलल्यानंतर ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या मालिकेचा टीआरपी २.२ इतका घसरला आहे. त्यामुळे ती टॉप-५ यादीतून बाहेर पडली आहे. नव्याने सुरू झालेल्या ‘काजळमाया’ला मात्र २.९ इतका ओपनिंग टीआरपी मिळाला असून पुढील आठवड्यात तिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा.. रुचिरा जाधवचं विराटप्रेम! स्वतःच्या हातांनी काढलं विराट कोहलीचं सुंदर स्केच; चाहत्यांनी केलं कौतुक

सध्या मराठी मनोरंजन विश्वात प्रेक्षकांची आवड, कथा, कलाकारांची केमिस्ट्री आणि सादरीकरण या सर्वांचा परिणाम TRP वर स्पष्टपणे दिसत आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ ने TRP मध्ये मिळवलेली ही झेप मराठी मालिकांच्या स्पर्धेत नव्या उत्साहाने नवा अध्याय लिहिते आहे.

हे पण वाचा.. १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अभिनेता कपिल होनरावचं स्वप्न साकार; मुंबईत घेतलं हक्काचं घर, म्हणाला – “आजही विश्वास बसत नाही”