ADVERTISEMENT

ठरलं तर मग’ पुन्हा नंबर वन! ‘कमळी’ची पहिल्यांदाच टॉप-५ मध्ये एन्ट्री; पाहा आठवड्याचा नवा मराठी मलिका टीआरपी रिपोर्ट

marathi malika trp new list : आठवड्यातील Marathi Malika TRP लिस्टमध्ये मोठे उलथापालथ झाले आहेत. 'ठरलं तर मग'ने पुन्हा पहिला क्रमांक मिळवला असून, झी मराठीवरील 'कमळी' मालिकेने पहिल्यांदाच टॉप-५ मध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे.
marathi malika trp new list

marathi malika trp new list : मराठी मालिकांच्या जगतात प्रेक्षकांची पसंती आणि TRP रेटिंग हीच यशाची खरी ओळख असते. या आठवड्यातील नवीन Marathi Malika TRP रिपोर्टनुसार अनेक मालिकांमध्ये चांगली चढ-उतार दिसून आली आहे. १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत प्रसारित भागांच्या आकडेवारीत काही जुन्या मालिकांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे, तर काही नव्या मालिकांनी थेट टॉप लिस्टमध्ये झेप घेतली आहे.

प्रेक्षकांची आवडती मालिका ‘ठरलं तर मग’ या आठवड्यातही पहिल्या स्थानी कायम राहिली आहे. सायली आणि अर्जुन यांच्या जोडीतील केमिस्ट्री, कथानकातील भावनिक वळणे आणि कौटुंबिक वातावरणामुळे ही मालिका सतत TRP च्या शिखरावर आहे. ताज्या आकडेवारीनुसार ‘ठरलं तर मग’ने ५.६ रेटिंग मिळवत पहिल्या क्रमांकावर आपली पकड कायम ठेवली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर आहे ‘तू ही रे माझा मितवा’. या मालिकेची वेळ बदलल्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यातही या शोने ५.० रेटिंगसह उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अर्णव आणि ईश्वरीची कथा प्रेक्षकांना खूप भावते आहे.

तिसऱ्या स्थानावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका पोहोचली असून सध्या सुरु असलेले फ्लॅशबॅक एपिसोड्स प्रेक्षकांना भावत आहेत. जानकी आणि हृषिकेश यांच्या लग्नाआधीच्या प्रेमकथेनं मालिकेला नवं रंगतदार वळण दिलं आहे.

४.१ रेटिंगसह ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘नशीबवान’ या दोन्ही मालिकांनी चौथ्या क्रमांकावर संयुक्त स्थान पटकावलं आहे. दोन्ही कथानकांतील कौटुंबिक संघर्ष आणि नात्यांचे भावनिक पैलू प्रेक्षकांना जोडून ठेवत आहेत.

या आठवड्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेली मालिका म्हणजे ‘कमळी’. पहिल्यांदाच टॉप-५ मध्ये एन्ट्री घेत ‘कमळी’ मालिकेने झी मराठीच्या प्राइम स्लॉटमध्ये आपली मजबूत उपस्थिती दाखवली आहे. ३.९ रेटिंगसह या मालिकेने लोकप्रियतेचा नवा टप्पा गाठला आहे.

याशिवाय ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ (३.७), ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (३.६), ‘येड लागलं प्रेमाचं’ (३.३) आणि ‘देवमाणूस’ (२.९) या मालिकांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या मालिकेची वेळ बदलल्याने ती टॉप-१५च्या यादीबाहेर गेली आहे.

हे पण वाचा.. बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणची अजित पवारांशी खास भेट; घर बांधकामाबाबत व्यक्त केलं समाधान

सध्या प्रेक्षकांची आवड झपाट्याने बदलत असून आगामी आठवड्यांमध्ये Marathi Malika TRP लिस्टमध्ये आणखी नवे ट्विस्ट पाहायला मिळतील यात शंका नाही.

हे पण वाचा.. भूषण कडू सध्या कुठे आहे हे मला खरंच माहीत नाही”; अभिनेता आशिष पवारचा स्पष्ट खुलासा