Marathi Actor Ajinkya Raut चा निर्मात्यांवर आरोप; म्हणतो, “९ लाख रुपये थकीत… आत्महत्या हा उपाय नाही!”

Marathi Actor Ajinkya Raut

“इंजिनिअर असूनही हे क्षेत्र निवडलं… पण आज मनात खंत आहे,” – Marathi Actor Ajinkya Raut याने थेट निर्मात्यांकडे ९ लाखांची थकीत रक्कम मागताना शेअर केला भावनिक संदेश!

मुंबई – मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आपली खास ओळख निर्माण करणारा Marathi Actor Ajinkya Raut सध्या सोशल मीडियावर एका भावनिक पोस्टमुळे चर्चेत आहे. ‘मन उडू उडू झालं‘ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेला अजिंक्य राऊत याने नुकताच एक व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने स्पष्ट सांगितलं की काही निर्मात्यांकडून त्याला ९ लाखांहून अधिक रक्कम अजूनही मिळालेली नाही.

या गंभीर मुद्यावर Marathi Actor Ajinkya Raut याने सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त करत म्हटलं आहे की, “मी इंजिनिअर असूनही या क्षेत्रात आलो. ज्या कामासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतली, त्याचं मानधन जर मिळत नसेल, तर ही कलाकार म्हणून मोठी हार आहे.” अजिंक्यच्या मते, एका मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेल्या कलाकारासाठी ९ लाख रुपये ही केवळ आर्थिक रक्कम नाही, तर त्याच्या मेहनतीचा सन्मान आहे.

कलाविश्वात गेल्या काही दिवसांत आत्महत्येच्या बातम्यांनी हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेता तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येनंतर मराठी इंडस्ट्री पुन्हा एकदा हलली आहे. हाच धागा पकडत Marathi Actor Ajinkya Raut म्हणतो, “काम मिळणं ही एक गोष्ट आहे, पण काम करूनही त्याचे पैसे न मिळणं, ही आणखी वेदनादायक गोष्ट आहे. आत्महत्या हा कधीच पर्याय नाही, पण कलाकारांची परिस्थिती एवढी बिकट होऊ नये की त्यांना टोकाचं पाऊल उचलावं लागेल.”

हे पण वाचा ..मराठी अभिनेता tushar ghadigaonkar चं दु:खद निधन; नैराश्यातून घेतले टोकाचं पाऊल, मराठी मनोरंजनविश्व हादरलं

आपल्या व्हिडिओमधून अजिंक्यने कलाविश्वातील अंधाऱ्या बाजूवर प्रकाश टाकत एक वेगळीच चर्चा निर्माण केली आहे. तो पुढे म्हणतो, “बॅक टू बॅक काम करणं, नाव कमवणं आणि टिकून राहणं या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. इथे स्पर्धा आहे, संघर्ष आहे. तरीही काही कलाकार सतत मेहनत करत असतात, तेही फॅमिलीपासून दूर राहून.”

व्हिडिओमध्ये Marathi Actor Ajinkya Raut असंही स्पष्टपणे सांगतो की, “कोणतीही रक्कम असो – ४ रुपये असोत की ४ लाख – ती त्या कलाकाराच्या कष्टाची कमाई आहे. निर्मात्यांनी ती वेळेत द्यावी. कलाकारांना काम नका देऊ, पण जे दिलंय त्याचे पैसे द्या.”

तो पुढे म्हणतो, “मी स्वतः इंजिनिअर असूनही स्वतःच्या आवडीपोटी या इंडस्ट्रीमध्ये आलो. आनंदाने काम केलं. पण आज एवढा वेळ जाऊनसुद्धा माझे ९ लाख रुपये मला मिळाले नाहीत. एक सामान्य घरातून आलेल्या व्यक्तीसाठी ही रक्कम फार मोठी आहे.”

अजिंक्यची भावना स्पष्ट आहे – कामासाठी झटणाऱ्या कलाकारांची मेहनत वाया जाऊ नये. त्याच्या म्हणण्यानुसार, “यावर काहीतरी ठोस आणि कठोर निर्णय घेणं सरकारचं आणि इंडस्ट्रीतल्या वरिष्ठांचं काम आहे. काम मिळवून देणं शक्य नसलं तरी, केलेल्या कामाचं योग्य मोबदला द्यावा, ही तरी जबाबदारी घ्यावी.”

हे पण वाचा ..एक नंबर, तुझी कंबर! २४ वर्षीय Ritika Shrotri चा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय; हटके अंदाज, संजू राठोडची खास कमेंट

अजिंक्यच्या या पोस्टला अनेक कलाकारांनी प्रतिसाद देत त्याला पाठिंबा दर्शवला आहे. मराठी मनोरंजन विश्वातील हा गंभीर विषय आता पुन्हा चर्चेत आला असून अनेकांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडत आहे.

त्यानं शेवटी म्हटलं, “माझा हेतू कोणावरही आरोप करणं नाही, पण हे वास्तव लोकांपुढं मांडणं गरजेचं आहे. आज जर आपण मूग गिळून गप्प बसलो, तर उद्या याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडतील. कलाकारांची आत्महत्या ही संवेदनशील बाब आहे, आणि आपण सर्वांनी मिळून यावर उपाय शोधायला हवा.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *